freecharge

Get Rs.50 instant cashback on mobile recharge of Rs.10 and above.


Use FreeCharge promocodes "FCREFWHATSB5J" "FCREF2G3UG6WV"


Download and install FreeCharge app.

Use credit or debit card only.

Code valid only once per debit/credit card & user.

Use and Share !!

Shop online and get extra CashBack !!

Monday, September 29, 2008

tu pathmori hotana

तू पाठमोरी होताना......


तू पाठमोरी होताना..
पापण्या ओल्या झाल्या,
तू परत फिरताना,
घन ओथंबून आले,
सांज अशी सरताना ..

आठवणी जाग्या झाल्या,
विरह तुझा छळताना,
रात सारी जागून गेली
चांदण्यात तुला शोधताना..

सुंगधही विरून गेला,
पंख तुझे वेगावताना,
रंग सारे विस्कटले,
तू पाठमोरी होताना..


किनाराही उदासून गेला,
ओहोटीत तू धावताना,
उचक्याही कंठात आल्या,
एकांत असा घालवताना..

श्वासाही अडकून गेला,
तु नजरेआड होताना,
उर सारा भरून आला,
क्षितीजे अशी दुर जाताना..

-- साहिल..

Tears smiled and rolled down , said "She is so nice that She made us free to flow on Your cheeks and We got True Chance to touch ur Lips....."

Saturday, September 27, 2008

tu aalis

तु आलीस...

तु आलीस,
घुंगरू घालून,
लटकत मटकत
लावण्यवती होवून..

तु आलीस
पाकळ्या होवून,
गुलाबी रंगात
चिंब भिजून

तु आलीस,
झुळूक होवून
लवत्या पात्याला,
उगाच लाजवून

तू आलीस
लाट होवून,
किनार सागराची
ओली करून

तू आलीस,
पहाट होवून
रातीच्या स्वप्नांना,
दवात भिजवून

तू आलीस,
चेतना होऊन
मरगळ्ल्या देहाला,
शिरशिरी भरवून

तू आलीस,
वेल नाजूक होवून,
वळणाच्या बांध्याला,
डौल देवून ..

तू आलीस
रेशम होवून
मखमली स्पर्शाला,
खळीत लाजवून ..

तू आलीस,
सावली होवून
रखरखत्या उन्हाला,
दुर लोटून

तु आलीस,
सांज होवून
आठवणीच्या दारात,
माप ओलांडून

तू आलीस,
सुरसंध्या होवून
वीणेच्या तारा,
अलगद छेडून

तू आलीस,
नक्षत्र होवून
चांदण्याचा सडा
ओंजळीत भरून

तु आलीस
माझी होवून,
मोकळ्या देहात
श्वास नवा घेवून

तु आलीस,
कविता होवून,
शब्दांच्या ताटात,
भावना ओवाळून..

-- साहिल

Monday, September 22, 2008

kay karu samjat nahi RC

काय करु समजत नाही......


COLLEGE DAYS....BEST DAYS OF MY LIFE....

LIFE MADHE EKDACH LIHILI.....MY FIRST AND LAST POEM TILL NOW...

काय करु समजत नाही....

काय करु समजत नाही ,

दिवस रात्र उमजत नाही...

तिच्या मनात काय आहे ते काही कळत नाही ,

विचारेन म्हणतो पण गाडी काही वळत नाही...

सिग्नल तर खूप दिले पण तिकडे कॅच होत नाही ,

बहुतेक माझी फ़्रिक्‍वेन्सीच मॅच होत नाही...

ती पण बघते , मी पण बघतो ,

सेटींग मात्र होत नाही ,

पण तिला मी आवडतो , यात काही खोट नाही...


....रोहित चौधरी.("RC")

ROCK ON !!

ek chehra

माझा कॉलेज मित्र देवेन्द्र पांचाळ ने लिहिलेली एक कविता......

एक चेहरा....

दिवसांमागून दिवस जातात
महिन्यांगून महिने........
वाटते गेल्या आठवड्यातच
कॉलेज चालू झाले.......

पण कॅलेंडरमध्ये बघितल्यावर
कळते तो आठवडा
दोन महिन्यांपूर्वीच गेला..........

दिवसभर लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स,
असाईनमेंट्स यामध्ये कधी
वेळ जातो कळतच नाही.......

मग घरी जाताना नेहमीचेच ते
कॅटिनमध्ये खाणे किंवा
कधी कधी प्रिंट्स......

घरी आल्यावर दोन मिनिटेही
बसवत नाही की
लगेच झोप लागते......
मग दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच

अनेक चेहरे रोज दिसतात
काही ओळखीचे तर काही अनोळखी..
अचानक एका चेह्ऱ्यावर नजर जाते
आणि मग तो चेहरा कायमचा मनात
घर करून जातो

नंतर असा एक दिवस जात
नाही की ज्या दिवशी
तो चेहरा आठवत नाही
घरी आल्यावर निवांतपणे
बसून तो चेहरा आठवून
विचार करावा तर कळते........
८ दिवसांवर परीक्षा आहेत........

आज मागे बघितल्यावर आठवते
खुप काही करायचे राहून गेले
जे काही आजपर्यंत मिळवले
त्यापेक्षा खुप काही गमावले

पण या सगळ्यात तो चेहरा
अजूनही विसरलेलो नाही
कदाचित विसरु शकतही नाही

पण जेव्हा जेव्हा
तो चेहरा आठवतो
तेव्हा एक गोष्ट
मनात पक्की होते की
आपल्याला खुप काही
साध्य करायचे आहे...............

porgi mhanje

पोरगी म्हणजे....

पोरगी म्हणजे
नाजूक कळा
पाहताक्षणी
लागतो लळा

पोरगी म्हणजे,
लहर स्वप्नाची,
रातचांदण्याला
जाग पहाटेची

पोरगी म्हणजे,
सर सर धारा,
देहावरती चिंब
ओघळ सारा

पोरगी म्हणजे,
वेल नाजूक,
अगंवळणातून
नेहमीच भावूक..

पोरगी म्हणजे,
सुर अलवार,
ऐकतना चेहर्‍यावर
उधळती तुषार

पोरगी म्हणजे,
धार तलवारी,
विव्हळताना आठवते
तीच एक कैवारी..

पोरगी म्हणजे,
वात्सल्याची गाय,
सहस्त्रकोटी देवांची,
एकच ती माय..

पोरगी म्हणजे,
जन्म आपला,
तिच्याविन
जगी अर्थ न कुठला..

-- साहिल..

Wednesday, September 17, 2008

tichya swapnacha rajkumar

तिच्या स्वप्नाचा राजकुमार..

SAHIL mhanto...
माझी ऑर्कूट मैत्रिण " अमृता किनारे " हिच्या आग्रहास्तव मी केलेली हि कविता. खुप दिवसापुर्वी पासून तीने मला मागितली होती. पण आज ती मला सुचली.कशी वाटते ते कळवा.

माझ्या राजकुमारा,
का रे सतावतोस,
स्वप्नात येवून
भासात मला छळतोस

तु असा तू कसा,
मज कळतच नाही,
वेड्या आशेतून
मी ही जागी होत नाही

तु सुंदर तु तेजस्वी,
तुझ्या छबीत मी फसवी
तु राजबिंडा, तु कणखर
तुझ्या स्पर्शास मी अधीर

तु प्रभूराम, तु मुक्तीधाम
तु कर्ण तु बासरी श्याम,
कसे कसे मी पाहू तुला,
प्रत्येक रुपात तुला प्रणाम

तु हुशार , तू चिरतरूण
तू पवन मयुर,तु वरूण,
तुझ्या येण्याची चाहूल
शहारते माझ्या देहावरून

तू प्रराक्रमी , तू अजिंक्य
तू अभय तू चाणक्य,
तू भेटशील मला रे केव्हा
तुजवाचून अपुरे माझे आयुष्य..

-- साहिल..

abol prem

अबोल प्रेम

हे फक्त माझ्याचसोबत
नेहमी असंच घडणार आहे?
तुझ्याबरोबरची प्रत्येक भेट
'ते' न बोलताच संपणार आहे?

भेट-वेळ रोजची ठरलेलीच
तरी अजून काय ठरणार आहे?
बोलायचं पटकन पण वेडं मन
त्याचाही मुहुर्त पाहणार आहे !

भेटतो तेव्हाच माहित असतं
निघायची वेळ येणार आहे
पटकन विचारावा प्रश्न हवासा
तर शब्द ओठीच अडणार आहे !

मी न विचारताच तू काय
हवं ते उत्तर देणार आहे?
हे पुरतं कळतंय तरीही
तोंड माझं का बोलणार आहे?

न बोलता बोललेले शब्द
तुला वेड्याला कळणार आहे?
मी बोलले/न बोलले तरी गप्पच
नेहमीसारखा तू राहणार आहे !

भावभावना समजून घेणं
सगळंसगळं थांबणार आहे
उष्ट्या कुल्फीची चव मात्र
जिभेवरती रेंगाळणार आहे

स्वप्न माझं हे संपलं तरीही
मनात तूच उरणार आहे
तुझ्यात मी नसले तरी
माझ्यात तूच सापडणार आहे !

....Shriram.

asahi prem asta

असंही प्रेम असतं!!

अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं....

काय करु? काहीच सुचतं नव्हतं...

उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात....

गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन....

थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले....

थडग्यावरचे नाव वाचले...' महनाज़ खान ' '१९८६-२००७'...

म्हणजे माझ्याच वयाची असेल!

कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल?

आजार? खून? का... का बाळंतपणात दगावली असेल ती?

मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले...

तेव्हढ्यात एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला....

मी त्याला विचारले ' तू भाऊ का तिचा?'

तो म्हणाला 'नाही, मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!'

मी विचारले ' आत्महत्येचं कारण?'

तो म्हणाला ' मला ब्लड कॅन्सर झालाय! २ आठवडे उरले आहेत फक्त!'

मी चकीत झालो!

विचारले ' मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतानाही?'

तो म्हणाला ' ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे!'

.......मी निशब्द....

असंही प्रेम असतं!!

Tuesday, September 16, 2008

ti mala parat bhetli tevha

ती मला परत भेटली तेव्हा..


आयुष्याच्या वाटेवरती
पाऊले अडखळली,
दिशा होत्या सोबतीला,
तरी उमेद माझी मरग़ळली

ती नव्हती सोबतीला तेव्हा,
क्षितीजे माझी दुरावली,
जगण्याची आशा आकांक्षा,
आठवणीत होती विरघळली

.... मग अचानक..

ती का उगाच अशी
माझ्यासमोर आली,
बदललेली नजर अन खळी,
दुसर्‍याचीच होती तीच्या गाली..

पाहता तीला समोर,
आसवांची वरात निघाली,
गालावरच्या वाटेने,
अबोल ओठांना खुणवून गेली..

उधळता शब्दफुले नाजूक,
तीच काही बोलून गेली,
दिल्या वचनांची गाठ
अलगद मोकळी करून गेली..

काय होती ती तेव्हा,
अन काय ती आज झाली,
रात चांदण्याची फसवीच होती,
वर आकाशी खुणवून गेली

जखमा होत्या ओल्या जरी,
पाकळ्या खुडून काटे टोचून गेली,
जाता जाता झंकारलेल्या तारांना,
विस्कटून का ती निघून गेली...

का ती निघून गेली....

का ती निघून गेली...

--- साहिल..

Sunday, September 14, 2008

janmache ganit chukle

जन्माचे गणित चुकले..


काय होतो मी,
काय आहे मी,
संभ्रम मनीचा,
घोटाळतो आहे मी

काय दिले मी,
काय घेतले मी,
अर्थ जिंदगीचा
उलगडतो आहे मी

चार दिस उन,
चार दिस सावली,
वाट काट्याची,
चालतो आहे मी..

सोसाट्याचा वारा,
टपोर्‍या गारा,
हरवलेल्या दिश्यांना,
शोधतोय निवारा..

ओठ शिवले,
शब्द गोठले,
स्फुरताना काही,
संदर्भही चुकले..

कुठला मृत्यु,
कसला आत्मा,
शोधताना वाटले,
जन्माचे हे गणितच
कसे काय चुकले..

--- साहिल..