Saturday, June 27, 2009

aaj swatahala shodhto mi

आज स्व:ताला शोधतो मी.............

घरात येणाऱ्या प्रत्येक सुर्य किरणांत....

सकाळच्या त्या धुंद वातावरणात..

पक्षांच्या त्या किलबिलाटात.......

घड्याळात वाजणाऱ्या प्रत्येक सेकंदात......

पडणाऱ्या पावसाच्या थेंबात.........

दरवळणाऱ्या मातीच्या सुगंधात......

आठवणीतल्या प्रत्येक दिवसात....

सहज मिळालेल्या रिकम्या वेळात...

अडखळुन पडल्यावर
झालेल्या प्रत्येक जखमेत....

मनात योजलेल्या हर एक कल्पनेत

"जीवन" शोधतो मी..............

जीवन शोधता शोधता
आज स्व:ताला शोधतो मी.............


->DEV<-

Monday, June 22, 2009

ti mulgi marathi aste

कंपनीमधे अनेक सुंदर मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.

कंपनीमध्ये मुली जीन्स घालुन येतात,
पण जि जीन्स बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.

कंपनीमधे अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते

कॉलेजमधे अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते

शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते
ती मुलगी मराठी असते

प्रेम सगळे करतात
पण आयुष्यभर जी कुठ्ल्याही परीस्थीमध्ये
जी प्रेमाने साथ् देते
ती मुलगी मराठी असते

Thursday, June 18, 2009

mala ajun jagayche ahe

मला अजुन जगायचे आहे..............
आजपर्यंत काहीच नाही केलं तरी
पुढे खुप काही कमवायचे आहे........

अनेक चुका नकळत घडल्या तरी
अजुन एक चुक करायची आहे......

अनेकदा अडखळून पडलो तरी
आज पुन्हा ठेच खायची आहे......

अपुरा पडला वेळ जरी
थोडा अजुन Timepass करायचा आहे.........

भरुनी आले हे नयन जरी
हसतमुखाने वावरायचे आहे......

थकले हे पाय जरी
अजुन थोडे चालायचे आहे.....

राहीलो दुर्लक्षित जरी
कुणाचीतरी काळजी घ्यायची आहे.....

राहीले अर्धवट "तिचे" स्वप्न तरी
मला अजुन जगायचे आहे..............

->DEV<-

Friday, June 5, 2009

konitari aaple hi asave

कुणीतरी आपलही असावे..........

सकाळी साखरझोपेतुन उठवणारी...
तो चेहरा बघुन क्षणात झोप उडावी..

जीच्या हातचा कडु चहा
पण गोड वाटावा........

ऑफ़ीसमधला प्रत्येक रिकामी क्षण
तिचिच आठवण करुन देई...

तिच्यासोबत घालवलेला एकेक क्षण
एक तासासारखा वाटावा.....

जिच्या नसण्याने व्हावी
आयुष्यात एक मोठी पोकळी....

अशी हि "ती" म्हणजे
न संपणारे एक अखंड स्वप्नं असावे........

कुणीतरी आपलही असावे..........


---Devendra Panchal !
(Yet again :-D)