Sunday, November 28, 2010

lagna

Lagna...by Jaydeep Joshi

मी पसरवावं,तू आवरावं..........
मी समजवावं,तू समजावं.......
कधी मी पसरवायच्या आधीच,
तू मला थांबवावं,
कधी मी समजवायच्या आधीच,
तुला उमजावं.....
प्रेम आणि मैत्रीच्या या मिलापाला...
लग्नापेक्षा उचित काय नाव द्यावं?

- Jaydeep Joshi.
Celebrating one year of love and trust.........

Tuesday, January 12, 2010

jivlag mitra

हाच तर जिवलग मित्र असतो...

१ दिवस फोन नहीं केला तर रागवतो
फोन केला तरीही शिव्या घालतो

समोरून एखादी फाकडू पोरगी जात असेल तर
तिच्या समोर मस्त पोपट करतो

कॉलेज ला आल्यावर पहिला कॉल आपल्याला करतो
कुठे आहेस म्हणुन विचारतो

पिकनिक ला जाताना
आई बाबांना हाच तर मस्का लावायला कामी येतो

बाइक वरून पडलो की सगळे हसत असताना
धावत येउन उचलतो

आपण विसरलो तरीही
वाढदिवशी १२ वाजता बरोबर मेसेज करतो

परिक्षेच्या वेळी
सुपरवायज़रला घाल चुलीत म्हणुन सप्प्लिमेंट हातात देतो

काही चुकले तर ओरडतो
गरज असेल तर कान पीळतो

इतर मित्रांच्या तुलनेत
आपली जास्त काळजी घेत असतो

हाच असतो जो
आपल्या कली रूपी आयुष्याला फुलवत नेत असतो

हाच असतो जो
आपल्या कृष्ण-धवल आयुष्यात रंगांची उधलन करत असतो

दुखात असताना.. जवळ येउन काय झाल..? म्हणुन विचारतो
आपण नजर खाली करून काही नाही म्हणुन त्याला टाळतो

आपल्या डोळ्यात बघून
काय रे एवढा परका झालो का..? असा उलट प्रश्न करतो

सुखात हक्काने पार्टी मागणारा
आणि दुखात रडायला खांदा देणारा हाच तर जिवलग मित्र असतो...

-: PraseN -: