पाणी-पुरी..
एक कटोरी हातात घेऊन..
त्यात एक गच्च भरलेली पाणी-पुरी
ती उचलून तोंडात भरायची
तिचं ते गटकन फुटुन तोंडभर पसरणं
मग सगळीकडुन येणारा पूर आणि धूर
कधी तोंडातून.. कधी नाकातून
कानशीलाजवलून वहाणारा ओघळ घामाचा
लागलेला तो ठसका जीवघेणा..
आणि त्यानंतर रेंगाळलेली ती चव.. हवी हवीशी.!!
.
.
आयुष्यही असच काहीसं..
रोज त्याला हातात घेऊन उभं रहायचं
नव्याने भरलेली पाणी-पुरी खायची..
उसळणा-या लाटात मग डुंबायचं की बुडायचं..
ते ज्याचं त्यानेच ठरवायचं
लागतो कधी जीवघेणा ठसकासुद्धा
आणि त्यानंतर जगावसं वाटणारा दिवस नवा नवासा..!!
.
.
पण .. फक्त..
"भय्या... ज़रा मिठा बनाना" असे इथेही सांगता आलं असतं तर..........