Tuesday, June 10, 2008

chandane jhelte aj angavari

चांदणे झेलते आज अंगावरी
चंद्र हा सांगतो
सांगतो बातमी
चांदण्यातून गं
चालले आज मी

चंद्र हा सांगतो…

देऊनी वीज मी
घेतले चांदणे
सर्व माझ्या मनाचे
असे खेळणे
काय गेले “कुठे ?”
घेतले काय मी
चांदण्यातून गं
चालले आज मी

छंद माझ्या मनी
चांदण्यांनी दिला
सूर माझ्या गळी
केवडा माळला
शब्द देते “कुणी”
मांडते तोच मी
चांदण्यातून गं
चालले आज मी


चालताना हसे
ही झुळुक छानशी
बोलता ऐकतो
मेघ आसुसशी
मागुती कोण “हे”
घेत आधार मी
चांदण्यातून गं
चालले आज मी

चंद्र हा सांगतो
सांगतो बातमी
चांदण्यातून गं
चालले आज मी

गीत : स्वरांगी देव
संगीत : स्वरांगी देव
मीटर : शोधिशी मानवा राउळी मंदिरी

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=12625674364979040941

No comments:

Post a Comment