Tuesday, June 10, 2008

hallichya pori

हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत
इश्श…" म्हणुन मान खाली घालतच नाहित,
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

"नविन ड्रेस का ग?" विचारले तर ह्यांना येतो संशय
"नाहि रे जुनाच आहे", म्हणुन बदलतात विषय
नकट्या नाकावर लटका राग दिसतच नाही
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

मी घा-या डोळ्यांचे कौतुक करावे
मग तिनेही खुदकन हसावे
कशाचे काय….आजकाल गालांना खळ्या कशा पडतच नाहि
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

उद्या घोड्यावर होऊन स्वार येईल एक उमदा तरूण
होशिल का माझी राणी विचारेल हात हातात घेऊन
गोड गॊड स्वप्ने यांना आता पडतच नाही
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

पोर लग्नाची झाली म्हणुन, घरी आई-बाप काळजीत
"माझा नवरा मी कधीच शोधलाय" त्या डीक्लअर करतील ऎटित
घरून होकारासाठी कधी थांबतच नाहित
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत.....

No comments:

Post a Comment