झालीस जरी पराई
भेटलीस अशी अनाठाई
बावरलीस जरी बघून मला
मन तुझे सुने आहे
आजही डोळ्यातील तुझ्या
भाव मात्र जुने आहे.
बदललीस जरी तू दुनियेसाठी
विरह आलेला माझ्याच वाटी
डोळ्यात पाणी अन् गालावर खळी
असे तुझे जिने आहे
आजही ओठांवर तुझ्या
नाव मात्र जुने आहे.
बहुतेक हिच प्रेमाची परीक्षा आहे
खरं प्रेम करण्याची ही शिक्षा आहे
माझं तर उघड उघड पण तुझं
लपुन अश्रू पिने आहे
आजही गालावर तुझ्या
घाव मात्र जुने आहे.
http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=8565519669230155031
No comments:
Post a Comment