Tuesday, June 10, 2008

manapasun ti khup avadte mala

*********मनापासून ती खूप आवडते मला******

मनापासून ती खूप आवडते मला

तिच्या मनातलं, पण माहीत नाही

मी दिलेल्या फुलांपैकी एकही फुल

तिच्या हृद्याच्या वहीत नाही


श्वासाहून जास्त तिचे विचार येतात

ती विचारांच्या भानगडीत पडत नाही

म्हणते "मी भावनांच्या कुशीत गवसते"

पण विचारांच्या मिठीत सापडत नाही


डोळे तिचचं चित्र रेखाटतात

तिच्या डोळ्यांचं सांगू शकत नाही

दिसतो तिथे अधून मधून तसा

पण काजवा होऊन चमकत नाही


प्रत्येक स्वप्नात ती हजेरी लावते

तिच्या स्वप्नांचं सांगता येत नाही

समुद्राच्या वाळूत घर बांधायला

अजून तिचं मन तसदी घेत नाही


कदाचित तिच्या प्रेमात मी बुडतोय

ती बुडत असेल पटत नाही

दोघांच्या मनात एकसारखी क्रिया

घडत असेल असं वाटत नाही

@सनिल पांगे

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=4384258184818894974

No comments:

Post a Comment