Tuesday, June 10, 2008

najra najar jhali an ti nighun geli

नजरा-नजर झाली अन् ती निघून गेली...................

सकाळची गर्दी होती
स्टेशन वर मुंगिलाही जागा नव्हती
नेहमीच्या सवईप्रमाणे मला
7:32 ची लोकल पकडायची होती

बॅग चिलखताप्रमाणे लावून
जणू युद्धचीच चालली होती तयारी
काही करून खिडकीच पकडायची
पण रांगेत होते एकाहून एक अनुभवी भारी

ट्रेन ची वाट पाहता पाहता
सहज नजर बाजूला वळली
त्या रुपवातीला पाहून
माझी नजर क्षणार्धात भुलली

कोण?कुठली ? नाव?गाव?
ह्या प्रश्नांना पुर्णविराम मिळाला
ती अनोखी षोडशा पाहून
माझा तर फडशाच पडला

त्यादिवशी पहिल्यांदाच खरी
प्रेम भावना निर्माण झाली
प्रेमाची आयुष्यातील किंमत
तेव्हाच मला कळली

गर्दीतल्या शेकडो लोकांमधून
तिने मला पहावे एकदातरी
ही अशक्यप्राय आशा घेऊन
लोकांचे धक्के खात होतो बारी-बारी

तिच्याशी एका नजरा-नजरेसाठी
मी शेकडो ट्रेन सोडायला तयार होतो
स्वता:चे भान हरपलेला मी
त्या सौंदर्याचा शिकार होतो

अखेर तिच्याशी नजर भिडली
कान बधिर् होऊन हृदयाची हूरहुर वाढली
क्षणार्धाची घटना मनात घर करून गेली
नजरा-नजर झाली अन् ती निघून गेली.......................

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=18291330646328819166

No comments:

Post a Comment