वेड्या क्षणी भास होतो तू जवळ असल्याचा...
वेड्या क्षणी भास होतो तू जवळ असल्याचा,
डोळे उगाच दावा करतात तू स्पष्ट दिसल्याचा...
जुन्या त्या पऊलखुणांवर आजही रुणझुण तुझ्या पैंजणांची,
कानी हळूच गुनगुनते हवा.., आवाज जणु तू हसल्याचा...
एकांती कधी मज हाका देती, उधाणत्या त्या खळ-खळ लाटा,
एकटीच तरंगते हळूवार होडी.., भास जणु तू बसल्याचा...
दूर पश्चिमेला क्षितिजा-आड, एकाएकी मग दुरावतो सुर्य,
तांबूस आभाळ, तांबूस किनारा.., आभास जणु तू रुसल्याचा...
येता साद तुझ्या पाऊलांची, अन भोवताली वळून पाहता,
दाटून येते ह्रुदयी हूरहूर, अन मनी ध्यास.., तू... नसल्याचा...
नीरज...
http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=3607521847152672401
No comments:
Post a Comment