Monday, July 14, 2008

ayushyacha pravas

या आयुष्याच्या प्रवासात
अनेक माणसं भेटतात
काही आपल्याला साथ देतात,काही सांडून जातात
काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही आयुष्यभर साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात.
नाती जपता जपता, तुटणार,
कुणीतरी दूर जाणार,
नवीन नाती जुळत राहणार
आयुष्य म्हटले तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार
कुणी दूर गेले तर
जगणे थांबवता येत नाही
ह्या अथांग सागरात
एकटेच पोहता येत नाही!!!

No comments:

Post a Comment