तु आलीस...
तु आलीस,
घुंगरू घालून,
लटकत मटकत
लावण्यवती होवून..
तु आलीस
पाकळ्या होवून,
गुलाबी रंगात
चिंब भिजून
तु आलीस,
झुळूक होवून
लवत्या पात्याला,
उगाच लाजवून
तू आलीस
लाट होवून,
किनार सागराची
ओली करून
तू आलीस,
पहाट होवून
रातीच्या स्वप्नांना,
दवात भिजवून
तू आलीस,
चेतना होऊन
मरगळ्ल्या देहाला,
शिरशिरी भरवून
तू आलीस,
वेल नाजूक होवून,
वळणाच्या बांध्याला,
डौल देवून ..
तू आलीस
रेशम होवून
मखमली स्पर्शाला,
खळीत लाजवून ..
तू आलीस,
सावली होवून
रखरखत्या उन्हाला,
दुर लोटून
तु आलीस,
सांज होवून
आठवणीच्या दारात,
माप ओलांडून
तू आलीस,
सुरसंध्या होवून
वीणेच्या तारा,
अलगद छेडून
तू आलीस,
नक्षत्र होवून
चांदण्याचा सडा
ओंजळीत भरून
तु आलीस
माझी होवून,
मोकळ्या देहात
श्वास नवा घेवून
तु आलीस,
कविता होवून,
शब्दांच्या ताटात,
भावना ओवाळून..
-- साहिल
No comments:
Post a Comment