गाव
चला चला दोस्तानो, चला माझ्या गावाकड़
वेशीवर मारुतीला, घाला नमून साकड़
पुढ जाताना लागती, छोटी घराडी कौलारू
तीथ खेलती वाड्यात, छोटी मैना अणि मोरू
घरामाग मल्यामंदी, बाप पिकवी श्रीमंती
घाम पिउन अंगीचा, येती मातीतून मोती
माय थापत बसते, चुलीशेजारी भाकर
कंदा लासनीचा ठेचा, त्यात चवीला खोबर
आजी सांगत बसते, रामाक्रिश्नाची कहानी
येतो अवन्ढूनी गला, मनी येता आठवणी
कधी करता विचार, माला प्रश्न हाच पड़े
का ही कोपली धरणी, गाव पेटवून सारे?
नका येऊ दोस्तानो, अत माझ्या गवाकड़
आता संपल सगळ, बाकी मोडकी लाकड़
आता काही नाही तिथ, एक भिंत ही पडकी
लटकती खूंटीवर , धूळ भरली फड़की
ढीगारात दगडाच्या, माझ्या बापाची समाधी
माझ्या डोळ्यात टिप्पूस, गाव अन्धारन्या आधी.
--Shantanu Chandratre.
No comments:
Post a Comment