आज अचानक असे काय झाले..........................
आज पक्के ठरवले मनाशी
सगळं काही मार्गी लावायचे
पण झाली जाणीव
जेव्हा खऱ्या परीस्थितीची
खऱ्या अर्थाने त्यावेळी
तोंडुन शब्द फ़ुटेनासे झाले
मनातल्या सगळ्या Feelings मेल्या
डोळ्यातून अश्रुही निघेनासे झाले
लागलेली भुकही मेली
घसाही कोरडा पडला
या सगळ्यात कधी
संध्याकाळ झाली कळलंच नाही
दूर पहावे आकाशात तर........
पक्षीही आपल्या घरट्याकडे परतले नाहीत
चंद्रही आकाशात दिसला नाही
दिवसभर खुप विचार केला
पण काय झालं कळलंच नाही
आज अचानक असे काय झाले.........................
---Devendra Panchal !
No comments:
Post a Comment