दुरवर जाते ही वाट.........
दुरवर जाते ही वाट
बजबजतो पक्षांचा किलबिलाट
खळखळत वाहते ते समुद्राचे नीळेशार पाणी
अशा या रम्य संध्याकाळी
मन आठवणींनी दाटुन येई
आठवतो तो भुतकाळ
करुन देई जाणीव
एका कटू सत्याची
"तिला माझे शब्द कधी कळलेच नाहीत"
मनात उठवी अनेक भावनांचा कल्लोळ
तरीही आणुन देई ओठांवर हसु
कदाचित जिवन याचेच नाव
अचानक पुन्हा वर्तमानकाळात आणुन सोडी
न मग डोळ्यांसमोर दिसते ती
दुरवर जाते ही वाट.
---Devendra Panchal....
(who else !)
No comments:
Post a Comment