असे हे आमचे आयुष्य.........
"कशासाठी जगतो आम्ही"
याचे उत्तर शोधत फ़िरणारे आम्ही सर्व,
घड्याळ्याशी बांधील आमचे आयुष्य
नसे कधी कुणाला कुणाची भ्रांत
रोजच उगवतो तो सुर्य न रोजच मावळतो
अशी आमचि ही गत
अचानक कुणीतरी आपल्याशी
आपुलकीचे दोन शब्दं बोलुन जातात
अन मग नकळतपणे
तयार होते एक वेगळेच विश्वं
रोजच्या धकाधकीच्या जीवनात
हवे हवेसे वाटू लागतात
ते विरंगुळ्याचे क्षण..........
अचानकपणे अपेक्षा वाढू लागतात
आणि न बोललेले शब्दं
ऐकायला येऊ लागतात
लवकरच समोर येते
एक निखळ सत्य
मागे राहतो तो फ़क्तं एकांत
आणि एक निरव शांतता
अन मग शेवटपर्यंत सापडत नाही
ते "का" ह्या प्रश्णाचं उत्तर.........
-->DEV<--
No comments:
Post a Comment