दुर असे जाताना..........
दुर असे जाताना
भास तुझाच होई
पुढे निघालेली पावले
माझी थांबून जाई
सर्व काही एका क्षणात
स्तब्धं होऊन जाई
दिसु लागतो सगळीकडे तुझाच चेहरा
जिथे नकळत मन हरवुन जाई
नसलीस जरी माझी तु
क्षणोक्षणी काळजी
तुझीच करते हे मन
असले जरी हे सत्यं की
तुला हे कधीच कळणार नाही
तरी हे जीवन काही
कुणासाठी थांबत नाही
असेच ह्या आयुष्यात
दुर असे जाताना
भास तुझाच होई..............
-->DEV<--
No comments:
Post a Comment