मन
हातातला हात कधी सुटला कळलंच नाही,
त्या हात सुटण्यामागच कारण कधी समझलच नाही.......
तू पुन्हा भेटशील अशी वेडी आशा आहे,
मागे राहिलेल्या आठवणींचा हाच तर उजाळा आहे.....
तुझं येणं आणि माझं जाण हा केवळ योगायोग नव्हता,
तुझ्याशी बांधलेल्या नात्याचा हाच खरा ऋणानुबंध होता.....
वाटा वेगळ्या झाल्या तरी मन वेगळी नाहीत,
म्हणूनच तर समांतर रेषा कधीच जुळत नाहीत.....
नजरेतून जे कळते ते मनातले असते,
मनात जे असते ते कधीच ओठावर नसते.....
जीवन हे वाहत्या नदीसारखे असते,
मागे वळून न पाहता पुढेच जायचे असते.....
आज सहजच मला कविता सुचल्या असाव्यात,
देवाला कदाचित आमच्या भेटी घडवायच्या असाव्यात....
तुझी नी माझी मैत्री ही देवाची कृपा आहे,
जसा "तो" आपल्या मैत्रीतला दुवा आहे....
Written by
Kalpa S. Borhade.
kalps2509@gmail.com
good one..
ReplyDeleteKhupach chan kalpa, keep it up!
ReplyDelete