freecharge

Get Rs.50 instant cashback on mobile recharge of Rs.10 and above.


Use FreeCharge promocodes "FCREFWHATSB5J" "FCREF2G3UG6WV"


Download and install FreeCharge app.

Use credit or debit card only.

Code valid only once per debit/credit card & user.

Use and Share !!

Shop online and get extra CashBack !!

Monday, August 18, 2008

mi ek engineer

मी ऐक इंजिनियर


आज - काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतात
शाळेतल्या - कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतात
सध्या काम कमी अन् वेळ भरपूर
कंटाळा आलाय आता नेट सर्फिंग करून
काय करणार सध्या बेंच वर आहे
कारण शेवटी मी एक Engineer आहे


दिवसातले किमान 10 तास मी कंपनी मध्ये घालवतो
कंपनीच्या पैश्याचे A\C, नेट अन् टेलिफोन्स वापरतो
चार - चार वेळा कॉफी प्यायची सवय लागली आहे मला पण माझ्या
कॉलेज canteen च्या कटींगची सर नाही त्याला
कंपनीतले बेचव जेवण गोड मानून घेतो आहे
कारण शेवटी मी एक Engineer आहे


कट्ट्यावरच्या गप्पा तर कधीच मागे पडल्या
A\C Coneference rooms मध्ये आता मीटिंग्स होऊ लागल्या
टीम - मेटसच्या गर्दीत माझ्या मित्रांची टोळी हरवली
पक्या , अज्या , रघूची जागा आता मूर्थी , कृष्णन आणि रेवतीने घेतली
ODC मध्ये एकतरी मराठी माणूस शोधतो आहे
कारण शेवटी मी एक Engineer आहे


सुरुवातीला खूप फोन SMS व्हायचे
कोण कुठे काय करतोय लगोलग कळायचे
आजकाल जो - तो project मध्ये बिझी ज़ालाय
भुला भटका missed call आता महाग झालाय
forwards आणि chain mails मध्ये खुषालीची मैल शोधतो आहे
कारण शेवटी मी एक Engineer आहे


दर वीकएण्डसला मे मल्टीप्लेक्स मध्ये जातो
दीड - दमडीच्या मुव्हीसाठी शे - दीडशे मोजतो
सेलेब्रेशन्स , पार्टीज साठी pizza hut cha चा रस्ता गाठतो
vegie crust, paporonie कसले कसले फ्लेवर्स मागवतो
पण pocket money साठवून केलेल्या party ची मजा ह्यात शोधत आहे
कारण शेवटी मी एक Engineer आहे


रोजचा शिरस्ता म्हणून घरी एक फोन लावतो
एकुलता-एक असण्याचे आपले कर्तव्य पार पाडतो
" आता कधी येशील ?" असे आई रोज विचारते
बाबांच्याही आवाजात हल्ली खूप चिंता जाणवते
करियर आणि आई-बाबांपैकी मे माझ्या करियरला निवडले आहे
कारण शेवटी मी एक Engineer आहे

खरच सारे काही गेलेय आता बदलून
एका टॅग ने ठेवलाय माझे आयुष्य जखडून
कधीतरी तो दिवस येईल
office मधून थेट मी माझ्या घरी जाईन
पण मला माहितेय हे एक स्वप्न आहे
कारण शेवटी मी एक .....

Thursday, August 7, 2008

ekta asava asa vatta

एकट असाव अस वाटत...

एकट असाव अस वाटत
कधी कधी जवळ कुणी नसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत

अवती भोवती रान सगळ
मुक मुक असत
वाट दिसु नये ईतक
धुक धुक असत
झाडाखाली डोळ मिटून बसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत

येते येते हूल देते
सर येत नाही
घेते घेते म्हणते तरी
जवळ घेत नाही
अशा वेळी खोट खोट रुसावस वाटत
कधी कधी जवळ कुणी नसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत

कुठे जाते कुनासठाउक
वाट उन्च सखल
त्यात पुन्हा सगळीकडे
निसरडीचा चिखल
पाय घसरुन आदळल्यावर ह्सावस वाटत
कधी कधी जवळ कुणी नसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत

पाखर जरी दिसली नाहीत
ऐकु येतात गाणी
आभाळ कुठल कळ्त नाही
इतक निवळ पाणी
आपल्या डोळ्यात आपल रूप दिसावस वाटत

ओळीमागुन गाण्याच्या
थरारत जावस वाटत
आभाळतुन रन्गाच्या
भरारत जाव
सुराच्या रानात भुलुन फुलावस वाटत


कधी कधी जवळ कुणी नसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत ....

Tuesday, August 5, 2008

athvan

आठवण आली तुझी की,

नकळत डोळ्यांत पाणी येतं..

मग आठवतात ते दिवस

जिथं आपली ओळख झाली..

आठवण आली तुझी की,

माझं मन कासाविस होतं

मग त्याच आठवणीना..

मनात घोळवावं लागतं..

आठवण आली तुझी की,

वाटतं एकदाच तुला पाहावं

अन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं..

पण सलतं मनात ते दुःख..

जाणवतं आहे ते अशक्य...

कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य...

पण तरिही.........

आठवण आली तुझी की,

देवालाच मागतो मी....

नाही जमलं जे या जन्मी

मिळू देत ते पुढच्या.........

Friday, August 1, 2008

mansacha havyas

DOMBIVLI FAST picture athavtoy....??
MADHAV AAPTE athavtoy??
mag he ekda vachach...mi ardha taas ghalvun lihile ahe.........




हव्यास, हव्यास जडलाय...अधिक जास्तीचा हव्यास..आंगन वावर पुरेना , मग मोकरी धंदे सुरु झाले. नोकरीत पगार पुरेना , धंद्यात नफा पुरेना..मग तो मीळवने सुरु झाले..पगारवाढ़ी साठी संप, दमदाटी,मोर्चे...नफावाढ़ी साठी खोटेपण, चिरी - मिरी, चोरी....

शेवाळ वाढतच गेले...दलदलीत फसत गेलो साला...
छान लिहायचो...चित्र काढायचो...पण मग पैसे हवेत...स्थिरता म्हणुन बँकेत...बी-कॉम पर्यंत एवढा शिकलो, एवढे वाचले पण पुढे काय तर ledger भरा, परिपत्रके लिहा...जेवढा न्हाय्लो आधी तेवढाच कोरडा होत गेलो...थेंब सुद्धा उरला नाही ओलाव्याचा दाखवायला सुद्धा...एक रेषेत उभे रहा,एक रेषेत लिहा..एक दमात पदवी मिळवा, एक वर्षात कायम व्हा...एक इच्छेसाठी लग्न करा अणि ती दुहेरी करण्यासाठी मुले जन्माला घाला.....

एक एक करून अनेक गोष्टी करा.....आणि मग एकदा मरा..............

म्हणजे एका कडून एकीकडे एकटे यायचे, एकटे जायचे आणि मधे हा साला जीवघेणा प्रवास........

अरे साला मग हा प्रवास सरळ नको का......?? मनासारखा नको का ??

ठरवला न सग्ल्यांनी की नियम करायचे, पाळायचे.....मग मोडायचे का ??? सग्ल्यांनी मिळून खायचे का सगळ्यांचे आपणच खायचे ??? ठरवा...शिस्त नको...मग व्हा...बेशिस्त व्हा...लाज सोडायची तर मग सग्ल्यान्नीच सोडा...एकट्यानेच कशाला ? जगू अणि जगू द्या असा नियम नको असेल, तर मग सग्ल्यांनी मिळून ठरवा की मारू आणि मारू द्या...सग्ल्यान्ना मारू....

संपवून टाकू हे सगळ...अणि सांगू तय विधात्याला...नाही आवडला हा तुझा खेळ......

I UNDERSIGNED, MADHAV AAPTE, MAKING THIS DECLARATION THAT DUE TO MY OWN

PHILOSOPHIES, I AM NOT ELGIBLE TO LIVE ON THIS PLANET...SO PLEASE TAKE AWAY MY SERVICES...AND I DONT EXPECT ANY PAYMENT FROM YOU...I DONT!!
INFACT I WOULD LIKE TO GIVE ALL DUES ON MY ACCOUNT...
SO PLEASE, LORD...AND I AM ENCLOSING MY BODY WITH MY SOUL INTACT WITH THIS DECLARATION.
SO PLEASE ACCEPT THIS AND RELEIVE ME AT THE EARLIEST...PLEASE.......
AND GIVE ME YOUR STATEMENT.................