एकदा एका रात्री.....
एकदा एका रात्री
तुझी आठवण झाली
तेव्हा लगेच एक चांदणी
पटकन चमकून गेली
दोन्ही हात जोडुन देवाला
मागने मागितले एक
तूच सतजन्मि मला
पती म्हणून भेट
मागने मागून डोळे उघडले
माझ्या पुढे तू दिसलास
बघून तुला लाजले जरा
तू तुझा हात माझ्या हातात दिलास
अचानक वारे जोरात आले
हात आपले पटकन सुटले
झटकन उठून उभी राहीले
माहीत पडले स्वप्नच तुटले...
Thursday, January 22, 2009
Thursday, January 15, 2009
kashasathi jagto amhi
कशासाठी जगतो आम्ही ?
जिथे नाही माणूसकीला किंमत
जिथे प्रत्येक गोष्ट मोजली जाते पैशात
माणूसच माणसाचा बनलाय शत्रू
त्याला बाकीचे प्राणी तरी काय करणार ?
वेळेशी बांधील आपले आयुष्य
नियती करी त्यावर स्मितहास्य
इथे स्वत:साठी वेळ नाही कुणाला
दुसऱ्याकडे कोण बघणार ?
जिथे संकटातच फ़क्त उदगार निघतात
"आम्ही सारे एक आहोत.........."
बाकीच्या वेळी तेच शब्द असतात
"आपण कोण आहात ?..................."
हे सर्व वर्णन करताना
कधी कधी शब्दही अपुरे पडतात
स्वत:साठी सगळेच जगतात
दुसऱ्यांसाठी जगतो तोच खरा माणूस......
---By DEVENDRA PANCHAL.
जिथे नाही माणूसकीला किंमत
जिथे प्रत्येक गोष्ट मोजली जाते पैशात
माणूसच माणसाचा बनलाय शत्रू
त्याला बाकीचे प्राणी तरी काय करणार ?
वेळेशी बांधील आपले आयुष्य
नियती करी त्यावर स्मितहास्य
इथे स्वत:साठी वेळ नाही कुणाला
दुसऱ्याकडे कोण बघणार ?
जिथे संकटातच फ़क्त उदगार निघतात
"आम्ही सारे एक आहोत.........."
बाकीच्या वेळी तेच शब्द असतात
"आपण कोण आहात ?..................."
हे सर्व वर्णन करताना
कधी कधी शब्दही अपुरे पडतात
स्वत:साठी सगळेच जगतात
दुसऱ्यांसाठी जगतो तोच खरा माणूस......
---By DEVENDRA PANCHAL.
Subscribe to:
Posts (Atom)