मला अजुन जगायचे आहे..............
आजपर्यंत काहीच नाही केलं तरी
पुढे खुप काही कमवायचे आहे........
अनेक चुका नकळत घडल्या तरी
अजुन एक चुक करायची आहे......
अनेकदा अडखळून पडलो तरी
आज पुन्हा ठेच खायची आहे......
अपुरा पडला वेळ जरी
थोडा अजुन Timepass करायचा आहे.........
भरुनी आले हे नयन जरी
हसतमुखाने वावरायचे आहे......
थकले हे पाय जरी
अजुन थोडे चालायचे आहे.....
राहीलो दुर्लक्षित जरी
कुणाचीतरी काळजी घ्यायची आहे.....
राहीले अर्धवट "तिचे" स्वप्न तरी
मला अजुन जगायचे आहे..............
->DEV<-
Thursday, June 18, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment