असे हे आमचे आयुष्य.........
"कशासाठी जगतो आम्ही"
याचे उत्तर शोधत फ़िरणारे आम्ही सर्व,
घड्याळ्याशी बांधील आमचे आयुष्य
नसे कधी कुणाला कुणाची भ्रांत
रोजच उगवतो तो सुर्य न रोजच मावळतो
अशी आमचि ही गत
अचानक कुणीतरी आपल्याशी
आपुलकीचे दोन शब्दं बोलुन जातात
अन मग नकळतपणे
तयार होते एक वेगळेच विश्वं
रोजच्या धकाधकीच्या जीवनात
हवे हवेसे वाटू लागतात
ते विरंगुळ्याचे क्षण..........
अचानकपणे अपेक्षा वाढू लागतात
आणि न बोललेले शब्दं
ऐकायला येऊ लागतात
लवकरच समोर येते
एक निखळ सत्य
मागे राहतो तो फ़क्तं एकांत
आणि एक निरव शांतता
अन मग शेवटपर्यंत सापडत नाही
ते "का" ह्या प्रश्णाचं उत्तर.........
-->DEV<--
Saturday, August 29, 2009
Thursday, August 20, 2009
ashi hi maitrin
अशी ही मैत्रिण...
अशी ही मैत्रिण...
समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी,
बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी.
चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी,
घर जवळ येताच पुढे निघून जावी.
आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी,
दिसलो की गालवर छान खळी पडावी.
कधी हसता हसताच ती रडावी,
कधी रडता रडताच खुद्कन हसावी.
हक्काने आपल्यावर रागवावी,
मग कही न बोलताच निघून जावी.
नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी,
आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट् करावी.
सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी,
निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी.
लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी,
वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी अबसेन्ट असावी.
ती आनंदात असली की घडघडुन बोलावी,
नाहीतर थोडीशी अबॊल रहावी.
सुखात सगळ्यांना सामिल करावी,
व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी.
बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी,
आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी.
परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी,
"साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी.
थोडा वेळ मग ती शांत रहावी,
पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?" म्हणुन विचारावी.
ती बरोबर असली की आधार वाटावी,
अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी....
महेश..
अशी ही मैत्रिण...
समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी,
बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी.
चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी,
घर जवळ येताच पुढे निघून जावी.
आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी,
दिसलो की गालवर छान खळी पडावी.
कधी हसता हसताच ती रडावी,
कधी रडता रडताच खुद्कन हसावी.
हक्काने आपल्यावर रागवावी,
मग कही न बोलताच निघून जावी.
नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी,
आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट् करावी.
सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी,
निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी.
लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी,
वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी अबसेन्ट असावी.
ती आनंदात असली की घडघडुन बोलावी,
नाहीतर थोडीशी अबॊल रहावी.
सुखात सगळ्यांना सामिल करावी,
व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी.
बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी,
आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी.
परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी,
"साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी.
थोडा वेळ मग ती शांत रहावी,
पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?" म्हणुन विचारावी.
ती बरोबर असली की आधार वाटावी,
अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी....
महेश..
Saturday, August 15, 2009
duur ase jatana
दुर असे जाताना..........
दुर असे जाताना
भास तुझाच होई
पुढे निघालेली पावले
माझी थांबून जाई
सर्व काही एका क्षणात
स्तब्धं होऊन जाई
दिसु लागतो सगळीकडे तुझाच चेहरा
जिथे नकळत मन हरवुन जाई
नसलीस जरी माझी तु
क्षणोक्षणी काळजी
तुझीच करते हे मन
असले जरी हे सत्यं की
तुला हे कधीच कळणार नाही
तरी हे जीवन काही
कुणासाठी थांबत नाही
असेच ह्या आयुष्यात
दुर असे जाताना
भास तुझाच होई..............
-->DEV<--
दुर असे जाताना
भास तुझाच होई
पुढे निघालेली पावले
माझी थांबून जाई
सर्व काही एका क्षणात
स्तब्धं होऊन जाई
दिसु लागतो सगळीकडे तुझाच चेहरा
जिथे नकळत मन हरवुन जाई
नसलीस जरी माझी तु
क्षणोक्षणी काळजी
तुझीच करते हे मन
असले जरी हे सत्यं की
तुला हे कधीच कळणार नाही
तरी हे जीवन काही
कुणासाठी थांबत नाही
असेच ह्या आयुष्यात
दुर असे जाताना
भास तुझाच होई..............
-->DEV<--
Tuesday, August 11, 2009
aajhi mi tasach ahe
आजही मी तसाच आहे......
काळ बदलला, वेळ बदलली
College चे रुपांतर मोठ्या
Corporate Office मधे झाले
Bench ची जागा
Personal Workstation ने घेतली
Casual Wears जाउन
Formals आले
Pocket Money चे रुपांतर
Salary मध्ये झाले.............
तरी आजही मी तसाच आहे
कधी कधी स्वत:च्या विश्वात
हरवुन जाणारा
कुठलीही गोष्टं घेण्याआधी
खुप विचार करणारा
कुणासाठी ’देवेन’
तर कुणासठी ’देव’.........
नसेन आजवर जरी कुठेच मी
आहे खात्री मला
करेन निर्माण स्वत:चे
एक वेगळे स्थान या जगात
नाहिच जमले कुठे जरी
तरी ’तिच्या’ ह्रुदयात ............
-->DEV<--
काळ बदलला, वेळ बदलली
College चे रुपांतर मोठ्या
Corporate Office मधे झाले
Bench ची जागा
Personal Workstation ने घेतली
Casual Wears जाउन
Formals आले
Pocket Money चे रुपांतर
Salary मध्ये झाले.............
तरी आजही मी तसाच आहे
कधी कधी स्वत:च्या विश्वात
हरवुन जाणारा
कुठलीही गोष्टं घेण्याआधी
खुप विचार करणारा
कुणासाठी ’देवेन’
तर कुणासठी ’देव’.........
नसेन आजवर जरी कुठेच मी
आहे खात्री मला
करेन निर्माण स्वत:चे
एक वेगळे स्थान या जगात
नाहिच जमले कुठे जरी
तरी ’तिच्या’ ह्रुदयात ............
-->DEV<--
Subscribe to:
Posts (Atom)