छेडुन जा सखे !!!
मित्रांनो आणि मैत्रिणिंनो ,ही कविता मी लिहीली नाही ,आपल्यात इतकी प्रतिभा असण शक्यच नाही ...
पण मनोगत (http://www.manogat.com/node/3711#comment-34678) वरची ही कविता ,४ स्पंदन चुकवून गेली हे मात्र नक्की !!!
उशाला माझिया
उमले मोगरा
गंध दुलईत
तुझाच बाबरा
श्वासात बेभान
उन्माद कापरा
देहात थरारे
तुझाच नखरा
करात माझिया
लाजते अबोली
होऊनि बेधुंद
मिटते पापणी
माझिया गळ्यात
हार दो करांचा
हलके उघडी
पडदा लाजेचा
स्पर्शाने तुझिया
वणवा पेटतो
बेभान किनारा
नदीला भेटतो
डोळ्यात माझिया
सखे तुझा नूर
जातेस का दूर
लावून काहूर
थांब ना जराशी
ओसरू दे पूर
छेडून जा सखे
एकदाच सूर
-- क्षिप्रा
No comments:
Post a Comment