Friday, June 13, 2008

kahi charolya

काही चारोळ्या

संध्याकाळच्या रंगीत आकाशात
जेव्हा दिशा भरकटून जातात
पंख फ़ुटलेली स्मृतीपाखरं
घरट्याकडे परतू लागतात

ओठांवर ओठ टेकवताना
भान दुनियेचं ठेवायचं नसतं
तूच तर सांगत असतेस ना, तेव्हा
डोळ्यांनीच डोळ्यांशी बोलायचं असतं

आयुष्यातल्या अशा प्रत्येक संध्याकाळी
वेदनांच्या सावल्या तीव्र लांबू लागतात
तुझ्याच मिठीत येऊन मी मनमुराद रडतो
गाल गोरे तुझेसुद्धा ओले होऊ पाहतात

आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात

चारचौघांमध्ये आठवणी वाटणं
ही भावनांची गुंतवणूक असते
मयूरपंखी रेशीमगाठी क्षणार्धात जुळून येतात
त्यातच त्यांची सव्याज परतफ़ेड मिळते

रात पुनवेची तारे आटून गेले,
प्याले नजरेचे ओठ चाटून गेले.
लाजता तू पुन्हा तशी गुलाबी,
रंग नभी पंचमी दाटून गेले.

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=5774057768239266676

No comments:

Post a Comment