Sunday, September 14, 2008

janmache ganit chukle

जन्माचे गणित चुकले..


काय होतो मी,
काय आहे मी,
संभ्रम मनीचा,
घोटाळतो आहे मी

काय दिले मी,
काय घेतले मी,
अर्थ जिंदगीचा
उलगडतो आहे मी

चार दिस उन,
चार दिस सावली,
वाट काट्याची,
चालतो आहे मी..

सोसाट्याचा वारा,
टपोर्‍या गारा,
हरवलेल्या दिश्यांना,
शोधतोय निवारा..

ओठ शिवले,
शब्द गोठले,
स्फुरताना काही,
संदर्भही चुकले..

कुठला मृत्यु,
कसला आत्मा,
शोधताना वाटले,
जन्माचे हे गणितच
कसे काय चुकले..

--- साहिल..

No comments:

Post a Comment