ती मला परत भेटली तेव्हा..
आयुष्याच्या वाटेवरती
पाऊले अडखळली,
दिशा होत्या सोबतीला,
तरी उमेद माझी मरग़ळली
ती नव्हती सोबतीला तेव्हा,
क्षितीजे माझी दुरावली,
जगण्याची आशा आकांक्षा,
आठवणीत होती विरघळली
.... मग अचानक..
ती का उगाच अशी
माझ्यासमोर आली,
बदललेली नजर अन खळी,
दुसर्याचीच होती तीच्या गाली..
पाहता तीला समोर,
आसवांची वरात निघाली,
गालावरच्या वाटेने,
अबोल ओठांना खुणवून गेली..
उधळता शब्दफुले नाजूक,
तीच काही बोलून गेली,
दिल्या वचनांची गाठ
अलगद मोकळी करून गेली..
काय होती ती तेव्हा,
अन काय ती आज झाली,
रात चांदण्याची फसवीच होती,
वर आकाशी खुणवून गेली
जखमा होत्या ओल्या जरी,
पाकळ्या खुडून काटे टोचून गेली,
जाता जाता झंकारलेल्या तारांना,
विस्कटून का ती निघून गेली...
का ती निघून गेली....
का ती निघून गेली...
--- साहिल..
No comments:
Post a Comment