सकाळ झाली,बंडू उठला,
डोळे चोळत ऒनलाईन आला.आज फूल बनवायला
नवीन फूल दिसते का,
शोध घेऊ लागला,मिळालेसुध्दा!
आनंदाने लिहू लागला,गुड मॊर्निंग!
मस्त स्नॆप आहे तुझा!
प्रोफाईल इंटरेस्टिंग आहे.
मैत्री करायला आवडेल?
नवखं फूल मोहरून गेलं!
फ्रेंडलिस्टमध्ये जावून बसलं!
कुठून कुठून कॊपी पेस्ट केलेल्या कविता,
बंडू पाठवत सुटला,फुल खुषीने वाचत बसले,
बंडूचा धीर चेपला,फुलाला लिहिले,
'आजकाल ऒरकुटचा चव्हाटा झालायं!
जी टॊक करु या?' फुल उगाच लाजले,
पुढचे बोलणे जी टॊकवर झाले!
बंडुला ओन्लाईन बघून नकळत,
खुदकन मनात हसू लागले!
बंडू अजून पुढे सरकला,
लोडशेडिंगचे कारण सांगत,
सेल्फोन नंबर विचारू लागला.
फुलाच्या मनात काय आले,
एकवार बंडूचे स्क्रॆपबुक बघावे वाटले!
हे देवा! टीना शिना मीना लीना,
बंडूची फ्रेंडलिस्ट,संपता संपेना!
प्रत्येकीशी तेच ते गोड बोलणे,
फक्त तुझ्यासाठी करत रेड रोझ पाठवणे,
फूल एकदम भानावर आले,
ऒर्कुट अकाऊंट क्लोज करून गेले.
मेल आय डी नंबर,हीच माझी ओळख का?
स्वतःला परत परत प्रश्न करू लागले.
ओर्कुटचे व्यसन असे कसे ला्गले?
Wednesday, July 16, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
lay bhari rao
Post a Comment