freecharge

Get Rs.50 instant cashback on mobile recharge of Rs.10 and above.


Use FreeCharge promocodes "FCREFWHATSB5J" "FCREF2G3UG6WV"


Download and install FreeCharge app.

Use credit or debit card only.

Code valid only once per debit/credit card & user.

Use and Share !!

Shop online and get extra CashBack !!

Monday, August 18, 2008

mi ek engineer

मी ऐक इंजिनियर


आज - काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतात
शाळेतल्या - कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतात
सध्या काम कमी अन् वेळ भरपूर
कंटाळा आलाय आता नेट सर्फिंग करून
काय करणार सध्या बेंच वर आहे
कारण शेवटी मी एक Engineer आहे


दिवसातले किमान 10 तास मी कंपनी मध्ये घालवतो
कंपनीच्या पैश्याचे A\C, नेट अन् टेलिफोन्स वापरतो
चार - चार वेळा कॉफी प्यायची सवय लागली आहे मला पण माझ्या
कॉलेज canteen च्या कटींगची सर नाही त्याला
कंपनीतले बेचव जेवण गोड मानून घेतो आहे
कारण शेवटी मी एक Engineer आहे


कट्ट्यावरच्या गप्पा तर कधीच मागे पडल्या
A\C Coneference rooms मध्ये आता मीटिंग्स होऊ लागल्या
टीम - मेटसच्या गर्दीत माझ्या मित्रांची टोळी हरवली
पक्या , अज्या , रघूची जागा आता मूर्थी , कृष्णन आणि रेवतीने घेतली
ODC मध्ये एकतरी मराठी माणूस शोधतो आहे
कारण शेवटी मी एक Engineer आहे


सुरुवातीला खूप फोन SMS व्हायचे
कोण कुठे काय करतोय लगोलग कळायचे
आजकाल जो - तो project मध्ये बिझी ज़ालाय
भुला भटका missed call आता महाग झालाय
forwards आणि chain mails मध्ये खुषालीची मैल शोधतो आहे
कारण शेवटी मी एक Engineer आहे


दर वीकएण्डसला मे मल्टीप्लेक्स मध्ये जातो
दीड - दमडीच्या मुव्हीसाठी शे - दीडशे मोजतो
सेलेब्रेशन्स , पार्टीज साठी pizza hut cha चा रस्ता गाठतो
vegie crust, paporonie कसले कसले फ्लेवर्स मागवतो
पण pocket money साठवून केलेल्या party ची मजा ह्यात शोधत आहे
कारण शेवटी मी एक Engineer आहे


रोजचा शिरस्ता म्हणून घरी एक फोन लावतो
एकुलता-एक असण्याचे आपले कर्तव्य पार पाडतो
" आता कधी येशील ?" असे आई रोज विचारते
बाबांच्याही आवाजात हल्ली खूप चिंता जाणवते
करियर आणि आई-बाबांपैकी मे माझ्या करियरला निवडले आहे
कारण शेवटी मी एक Engineer आहे

खरच सारे काही गेलेय आता बदलून
एका टॅग ने ठेवलाय माझे आयुष्य जखडून
कधीतरी तो दिवस येईल
office मधून थेट मी माझ्या घरी जाईन
पण मला माहितेय हे एक स्वप्न आहे
कारण शेवटी मी एक .....

1 comment:

manoj ghatage said...

11111111111111111111 nooooooooooooooooooooooooo