काय मजा आहे ?..
कोणाच्या आठवणीत जगण्याची मजा औरच आहे,
नाहितर नशिबी तिला विसरण्याचा हट्ट कायमचाच आहे..
मोकळ्या श्वासांना गुंतवण्याचा प्रयत्न कठिणच आहे,
पण श्वासाविना भासात जगण्याचा आनंद वेगळाच आहे..
किनार्याच्या वाळूत स्वप्न रेखाटण्याची सवय जुनीच आहे,
पण विरहाच वादळ होऊन किनारेच उध्वस्त करण्यात मजा आहे..
पावसात धुंद बेधुंद होऊन भिजण्यात काय उरलं आहे?
पावसालाच भिजवून अश्रूंचा बांध तोडण्यात खरी मजा आहे...
लुकलुकणार्या दिव्याभोवती ओंजळ धरण्यात काय अर्थ आहे,
वेगावलेल्या वार्याची फुंकर होऊन अंधार करण्यात मजा आहे..
रातीला डोळ्यात सजवून स्वप्न रंगवण्यात काय मजा आहे,
झोपेच्याच नक्षत्रालाच नजर लावण्यात खरी मजा आहे..
ह्रिदयाला बंदिस्त करून धडकन मोजण्यात काय मजा आहे?
खरतंर काळजाच्या तुकड्यात तिच्या अस्तिवाला वेचण्यातच मजा आहे...
-- साहिल..
Thursday, October 2, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
sahil mala tujhi kavita khup avadli........
jasti last lyn kharach khup chan ahe......
realy......beutiful...
Post a Comment