freecharge

Get Rs.50 instant cashback on mobile recharge of Rs.10 and above.


Use FreeCharge promocodes "FCREFWHATSB5J" "FCREF2G3UG6WV"


Download and install FreeCharge app.

Use credit or debit card only.

Code valid only once per debit/credit card & user.

Use and Share !!

Shop online and get extra CashBack !!

Saturday, May 5, 2012

pani puri


पाणी-पुरी..

 एक कटोरी हातात घेऊन..
त्यात एक गच्च भरलेली पाणी-पुरी
ती उचलून तोंडात भरायची
तिचं ते गटकन फुटुन तोंडभर पसरणं
मग सगळीकडुन येणारा पूर आणि धूर
कधी तोंडातून.. कधी नाकातून
कानशीलाजवलून वहाणारा ओघळ घामाचा
लागलेला तो ठसका जीवघेणा..
आणि त्यानंतर रेंगाळलेली ती चव.. हवी हवीशी.!!
.
.
आयुष्यही असच काहीसं..
रोज त्याला हातात घेऊन उभं रहायचं
नव्याने भरलेली पाणी-पुरी खायची..
उसळणा-या लाटात मग डुंबायचं की बुडायचं..
ते ज्याचं त्यानेच ठरवायचं
लागतो कधी जीवघेणा ठसकासुद्धा
आणि त्यानंतर जगावसं वाटणारा दिवस नवा नवासा..!!
.
.
पण .. फक्त..
"भय्या... ज़रा मिठा बनाना" असे इथेही सांगता आलं असतं तर..........

Maanus

Maanus

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.

मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात...

Saturday, April 14, 2012

ka itke karun hi dukh padrat padte

का? का?का?
का इतके प्रेम करुन देखील दुख पदरी पडते ?

कधी कधी माझे मन माझाबरोबर बंड करते
यात माझी चुक काय इतकेच अडवून धरते
का इतके प्रेम करुन देखील दुख पदरी पडते ?

कधी कधी असे वाटते ती अशी का करते?
... हात धरून माझा मी तुझीच आहे उदगराते
प्रेम करून माझावर मग त्याला का स्मरते?

ती त्याला विसरली नाही शेवटी हेच खरे ठरते
माझे सर्व तिथल्या तिथे कोसळून खाली पडते
आनंदाचे स्मित आता दुख चिंतेत आपोआप बदलते

आठवणींचे मोठे आभाळ माझा मस्तकी भरते
विराहचे अश्रू बनून हळू हळू खाली पझरते
इतके प्रेम करून देखील माझी बाजू आधुरी ठरते

का? का?का?
का इतके प्रेम करुन देखील दुख पदरी पडते ?

odh mhanje kay te

"ओढ"  म्हणजे काय ते
जीव लावल्याशिवाय समजत नाही.

"विरह" म्हणजे काय ते
प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.

"प्रेम" म्हणजे काय ते
... ... स्वत: केल्याशिवाय समजत नाही

"पराजय"म्हणजे काय ते
शत्रु कडुन हारल्याशिवाय समजत नाही

"दु:ख" म्हणजे काय ते
अपेक्षाभंग झाल्याशिवाय समजत नाही.

“सुख"  म्हणजे काय ते
स्वत: मध्ये शोधल्या शिवाय मिळत नाही......

ti asavi ashi

ती असावी अशी...




सगळेच म्हणतात.....
ती असावी अशी?
फुललेल्या गुलाबाची कळी जशी..
ती बोलावी अशी?
सुरात कोकिळा गावी जशी..
ती हसावी अशी?
लहानशी भाउली हसावी जशी..
अन ती दिसावी अशी?
अप्सरा पृथ्वीवर यावी जशी...
पण...
माझी ती परी मला हवी कशी?
.
.
.
.
ती मला हवी अशी...
चंद्रा कडे हि नसावी चांदणी जशी ...


~~अल्पशः अलिप्त

geli ahes duur

गेली आहेस दूर आता येऊ नकोस परत

गेली आहेस दूर आता येऊ
नकोस परत,

आता तुझी वाट पाहण्याची वाटत
नाही गरज..

अशीचं दूर दूर जा घेऊन त्या
हिरव्या आठवणी,

कोमेजुन गेल्यावर त्याना आता घालू
नकोस पाणी..

आता तू चालली आहेस
एकांत प्रवासाला,

किती अलगद तडे दिलेसना गं
माझ्या विश्वासाला..

थांबू नकोस आता वेळ
गेली टळून,

अशी समजू नकोस की माझे
ह्रदय येईल भरून..

तुझ्यासारखाचं मी ही झालो
आता निष्ठुर,

जसा शांत आगीतून निघतो
फक्त धुर..

~~अल्पशः अलिप्त