भारत माझा देश आहे
महासत्तेच्या वल्गना करणारा आमचा प्रतिनिधी UN मध्ये मूक होतो आहे
सर्वांच्या प्रचारसभेत नागरिक फक्त घोषणा देतो आहे
मी भगवा, मी हिरवा प्रत्येकजण भांडतो आहे
तरीही देशभर तिरंगा दिमाखात फडकतो आहे
बिहारमध्ये लालू यादव निर्लज्जपणे हसतो आहे
संसदेत प्रश्न विचारायला आमचा नेता पैसे घेतो आहे
तरीही 'भारत माझा देश आहे'चा प्रतिध्वनी ऐकू येतो आहे
भयाण अंधार सर्वत्र, भारतमातेचा जीव गुदमरतो आहे
सीमेवर जवान मूकपणे रक्त सांडतो आहे
त्याच्या शवपेटीकेवरही आमचा मंत्री कमिशन खातो आहे
गांधीटोपी घालून कुणीही स्वस्तात देशभक्त बनतो आहे
महात्म्याचा फोटो मात्र 'भवनात' धूळ खातो आहे
किटकनाशकं सापडली तरी कोका कोला अजून खपतोच आहे
बळीराजा मात्र अन्नपाण्यावाचून तडफडतो आहे
मर्डर, धूम हाऊसफुल्ल, स्वदेस मात्र आपटतो आहे
मंगल पांडेच्या जीवनातही चंगळवाद घुसतो आहे
स्वदेशीच्या घोषणा देणारा मर्सिडीजमधून हिंडतो आहे
आमचा कामगार मात्र फाटक्या संसाराला ठिगळं जोडतो आहे
अंगाला लावायचा साबणही विदेशातून येतो आहे
इथला बेकार युवक दाऊद्च्या टोळीत भरती होतो आहे
खलरक्षणाय सदनिग्रणाय पोलिस मनापासून काम करतो आहे
त्याची टोपी धूळ आणि पट्टा गंज खातो आहे
दयेच्या नावाखाली लाखो बांग्लादेशींना आम्ही पोसतो आहे
म्हणूनच निम्मा भारत आजही दारिद्र्यरेषेखाली जगतो आहे
एकेकाळी सोन्याचा धूर निघणारा हा देश विनाशाच्या दलदलीत बुडतो आहे
सोनं सगळं संपलं, आज फक्त धूर निघतो आहे
कशाचीही लाज राहीली नाही, देवही हताश झाला आहे
कारण आमचा गणपती 'कजरा रे'च्या तालावर नाचतो आहे
स्वप्नं सारी भंगली, स्वातंत्र्यसैनिक अश्रू ढाळतो आहे
आम्ही मात्र GRE,TOEFLच्या dates घेतो आहे
हूंदके देते भारतमाता, आम्हा करंट्यांचा धिक्कार आहे
मोहन भार्गव,माधव आपटे ची सर्वार्थानं आज या देशाला गरज आहे.....
Friday, June 13, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment