तु बरसलीस तेव्हा...
तुझ्या माझ्या भेटीला
आज मेघही तयार झाले,
घनकाळ्या आभाळातूनी
उगाच बरसायला निघाले...
दामिनिचे तांडव उगाच आज,
तुझ्या माझ्या मिलनाला सुरू झाले,
वार्याच्याही मंदगतीला कुणास ठाऊक,
सुसाट्याचे वेग आले...
भास्करही गेला लपून
काळ्या काळ्या ढगाआड,
अन उजेडाचे रानही
काळोखाने पळवून नेले..
आता वरुणराज बरसणार,
गार गार शहार सरींना घेवून,
पुन्हा एकदा खट्याळ होणार,
तुझ्यामाझ्या देहाला भिजवून..
तू जराशी आसरा सोडूनी
चालू लागलीस माळरानी,
मग तुला पाहूनी केली सुरुवात
जोरात बरसायला त्यानी..
चिंब ओलं तुझं भिजण,
पदर सावरत केसाना सावरण,
पावसांच्या सरींना ओंजळीत घेवूनी
अलगद माझ्यावर शिंपडण..
तुझी भिजलेली काया,
ओल्या प्रेमाची गुलाबी मोहमाया,
अता मला ही जळवत होती,
अन तुझ्या ओल्या श्वासांची दोर मलाही खेचत होती..
पावसाच्या विदाईने केला कहर,
तुझ्यामाझ्या देहस्पर्शाला छेडायला
आली त्या पवनराजाची ,
लाडावलेली शीत लहर..
शहार्याच्या या देहमिलनात,
तु ओठांच्या कंपातुन शहारत होती,
जणू आपल्या प्रेमात गुलाबी होऊनी,
तुच माझ्या अंगवळणी बरसत होती...
-- अनामिक-साहील..
(email - anamiksahil@gmail.com)
http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=4889351366933810022
Tuesday, June 10, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment