कातरेळचा पाऊस. . .
थोड्याच वेळात पावसाला सुरुवात होईल
आभाळ भरुन आलंय वाद्ळी मेघांनं . . .
मग टपोरे थेंब उतरतील अलगद खाली
कुठूनतरी वीजेचा कडकडाटही ऎकू येईल
मी बसलोय त्याच खिडकीत. . . पुन्हा एकटाच
का कोणास ठाऊक मला वाटतयं
की तिच्या इथंही बरसत असेन तो
अन. . . एकटीच असेन ती घरात
वाट पाहत. . . . . . . नवरांची. . .
सगळे रस्ते एव्हाना शांत झालेत. . .
अन अंधार देखील पडेल आता
मग तिही सावकाश खिडकीत येईल
का बरं उशीर झाला असेल त्याला?
ती विचारेल दहादा त्या खट्याळ वारांला. . .
केस मागे सारताना मग बांगड्याचा आवाज होईल
कडाडणारां वीजेत त्यांची किणकिण विरघळून जाईल
अन अश्याच कातरवेळी तिला तोही पावसाळा आठवेल
माझ्या मातीचा गंध तिला तिच्या मातीत जाणवेल
सगळं तेच, तोच पाऊस, तीच वेळ. . .तीच झाडं , तोच गंध
एक सुरुवात . . .तोच शेवटं . . . एका थेंबाचा अखेरचा बंध
विसरत आलेली एवढीच आठवण
सरत आलेल्या पावसात बरसुन जाईल
चुकलेली एक गार झुळूक. . .
माझ्याही घरांत मग फिरून जाईल
भानावर येईल ती मगं. . .
जेव्हा एक जोराचा कडकडाट होईल
तितक्यात दारावर ओळखीचा. . .
आणखी एक खडखडाट होईल
तो असेल. . .चिंब भिजलेला. . .काहीसा थकलेला. . .
तरीही डाव्या हातात असेल. . . तिच्यासाठी गजरा आणलेला. . .
पाणवलेल्या नजरेचा एक थेंब, अचानक मग गालावरुन ओघळेल
माळलेल्या गजरांची एक कळी, तितक्यात मग खुद्कन उमलेल. . .
- रोहन
Friday, June 13, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment