पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले...
पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले
हिमवर्षावातही कांती तव पाहूनी
तारका नभातल्या लाजल्या मनातूनी
ओघळले हिमतुषार गालावर थांबले
का उगाच झाकिसी नयन तुझे साजणी
सांगतो गुपित गोड स्पर्श तुझा चंदनी
धुंद या तुझ्या मिठीत देहभान हरपले
मृदूशय्या टोचते, स्वप्न नवे लोचनी
पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
रुप देखणे बघून नयन हे सुखावले
Tuesday, June 10, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment