freecharge

Get Rs.50 instant cashback on mobile recharge of Rs.10 and above.


Use FreeCharge promocodes "FCREFWHATSB5J" "FCREF2G3UG6WV"


Download and install FreeCharge app.

Use credit or debit card only.

Code valid only once per debit/credit card & user.

Use and Share !!

Shop online and get extra CashBack !!

Tuesday, June 24, 2008

maitri chya pausat

मैत्रीच्या पावसात
काल म्हटलं पावसाला,
माफ कर बाबा,
आज भिजायला जमणार नाही.

मैत्रीच्या पावसात भिजून
झालोय ओलाचिंब.

न्हा‌ऊ घालतोय बघ मला
शुभेच्छांचा प्रत्येक थेंब

मित्रांची इतकी गर्दी झालीय
भिजून भिजून बघ मला सर्दी झालीय

पा‌ऊस रिमझिम हसला.
ढगांना घे‌उन क्षितीजावर जाउन बसला.

जाता जाता म्हणाला,
"काळजी नको. भिजून घे खूप.
भिजणं थांबलं की घे पुन्हा मैत्रीचीच ऊब ...!

boltana jara sambhalun

बा॓लताना जरा सांभाळून.............


बा॓लताना जरा सांभाळून...
शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓,
फरक फक्त एवढाच की,
तलवारीन॓ मान तर,
शब्दांनी मन कापल॓ जात॓
जरी तलवारीच्या जखम॓तून रक्त
आणि शब्दांच्या जखम॓तून अश्रू...
य॓त असल॓ तरी,
दा॓घांपासून होणारी व॓दना मात्र सारखी असत॓.
म्हणून सांगतो शब्द जरा सांभाळून...
शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓
शब्दच माणसाला जोङतात आणि
शब्दच माणसाला तोङतात
ह॓ शब्दच आह॓त, त॓ कधी रामायण
तर कधी महाभारत तर कधी कवीता रचतात
तुझ्या एका शब्दावर माझ॓ सर्वस्व अवलंबून आह॓
तुझ्या एका शब्दावर माझ॓ हसण॓
तर, तुझ्या एका शब्दावर
माझ॓ रडण॓ अवलंबून असत॓.
म्हणून म्हणतो शब्द जरा सांभाळून...
शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓............

Tuesday, June 17, 2008

maitri mhatli ki

मैत्री म्हटली की
आठवतं ते बालपण
आणि मैत्रीतुन मिळालेलं
ते खरंखुरं शहाणपण

कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही

मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यांत श्रेष्ठ
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्ट

मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सुत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सुप्त भुक

मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खरे मित्र मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात

मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजुन
चिंब-चिंब नाहली

मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देउन
गालातल्या गालात हसणारे...

maitri tujhi

मैत्रि तुझी अशी असवी,

आयुश्यभर सोबत राहावी,

नको कधि त्यात दुरावा ,

नेहमीच नवा फ़ुलोरा,

मैत्रि अपुली अशी असावी,

सर्वांना एकत्रित अनावी,

हसने रुसने चालत राहवे,

एकमेकांना समजुन घ्यावे,

मैत्रि आपण अशी जगवी,

एकमेकांचा आधार असावी,

सुख दुखात नेहमी सोबत असवी,

असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे,

तुझी मझी मैत्रि अशी असावी.....

Sunday, June 15, 2008

nisarga

निसर्गासारखा नाही रे सोयरा
गुरू सखा बंधू मायबाप
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप
मिटती क्षणात आपोआप

त्याच्या संगतीत फिटतो संदेह
वितळतो क्षोभ माया मोह
त्याच्या संकीर्तनी मुरविता देह
भेटतो उजेड अंतर्बाह्य

त्याच्या स्मरणाने प्रकाशते मन
उजळते जग क्षणकाली
स्थिरावते पुन्हा चळलेले चित्त
पुन्हा मूळ वाट पायाखाली



गीत - सुधीर मोघे
संगीत - सलील कुलकर्णी
स्वर - रवींद्र साठे

dharitrichya kushi madhe

धरित्रीच्या कुशीमधे
बियबियाणं निजली
वर पसरली माती
जशी शाल पांघरली

बीय डरारे भुईत
सर्व कोंब आले वर
गहिवरलं शेत जसं
अंगावरती शहारं

ऊनवाऱ्याशी खेळता
एका एका कोंबांतून
प्रगटली दोन पानं
जसे हात ते जोडून

टाळ्या वाजवती पानं
दंग देवाच्या भजनी
जशी करती करुणा
होऊ दे रे आबादनी

दिसमासा होय वाढ
रोप झाली आता मोठी
आला पिकाला बहर
झाली शेतामध्ये दाटी

कशी वाऱ्यानं डोलती
दाणे आले गाडी गाडी
देव अजब गारुडी
देव अजब गारुडी....

kunachyahi itke javal jau naye

कुणाच्याही इतके जवळ जाऊ नये...

कुणाच्याही इतके जवळ जाऊ नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर हृदय कधी
तर जोडताना असह्य यातना व्हावी ,

डायरित कुणाचे नाव इतकेही येऊ नये
की पनाना ते नाव जड व्हावे
अचानक एक दिवस त्या नावाचे
डायारीत येणे बंद व्हावे ,

स्वप्नात कुणाला असेही बघू नये
की अन्धारताही त्याचे हात असावे,
तुटलेच जर स्वप्न कडी
तर आपल्या हातात काही नसावे,

कुणालाही इतका वेळ देऊ नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार असावा
एक दिवस आरशात आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा ,

कुणाचे इतकेही एकू नये
की आपल्या कानात त्याच्याच शबदाचा घूमजाव व्हावा
आणि एक दिवस आपल्याच तोंडातून
त्याच शबदाचा उचार व्हावा ,
पण
कुणाच्या इतकेही दूर जाऊ नये
की आपल्या सावली शिवाय आपल्या सोबत काहीच नसावे
दूरदूर आवाज दिला तरी
आपले शब्ड जागीच घुमावेत...

Friday, June 13, 2008

katarelcha paus

कातरेळचा पाऊस. . .

थोड्याच वेळात पावसाला सुरुवात होईल
आभाळ भरुन आलंय वाद्ळी मेघांनं . . .
मग टपोरे थेंब उतरतील अलगद खाली
कुठूनतरी वीजेचा कडकडाटही ऎकू येईल
मी बसलोय त्याच खिडकीत. . . पुन्हा एकटाच
का कोणास ठाऊक मला वाटतयं
की तिच्या इथंही बरसत असेन तो
अन. . . एकटीच असेन ती घरात
वाट पाहत. . . . . . . नवरांची. . .
सगळे रस्ते एव्हाना शांत झालेत. . .
अन अंधार देखील पडेल आता
मग तिही सावकाश खिडकीत येईल
का बरं उशीर झाला असेल त्याला?
ती विचारेल दहादा त्या खट्याळ वारांला. . .
केस मागे सारताना मग बांगड्याचा आवाज होईल
कडाडणारां वीजेत त्यांची किणकिण विरघळून जाईल
अन अश्याच कातरवेळी तिला तोही पावसाळा आठवेल
माझ्या मातीचा गंध तिला तिच्या मातीत जाणवेल
सगळं तेच, तोच पाऊस, तीच वेळ. . .तीच झाडं , तोच गंध
एक सुरुवात . . .तोच शेवटं . . . एका थेंबाचा अखेरचा बंध
विसरत आलेली एवढीच आठवण
सरत आलेल्या पावसात बरसुन जाईल
चुकलेली एक गार झुळूक. . .
माझ्याही घरांत मग फिरून जाईल
भानावर येईल ती मगं. . .
जेव्हा एक जोराचा कडकडाट होईल
तितक्यात दारावर ओळखीचा. . .
आणखी एक खडखडाट होईल
तो असेल. . .चिंब भिजलेला. . .काहीसा थकलेला. . .
तरीही डाव्या हातात असेल. . . तिच्यासाठी गजरा आणलेला. . .
पाणवलेल्या नजरेचा एक थेंब, अचानक मग गालावरुन ओघळेल
माळलेल्या गजरांची एक कळी, तितक्यात मग खुद्कन उमलेल. . .

- रोहन

pahili kavita

पहिल्या कवितेचा प्रयत्न,
कसा करु कळत नाही?
खूप काही मनात आहे,
पण कागदावरती येत नाही.

विषय घेऊ का चाल ठरवू,
सुरुवात आधी कशी करु?
मग म्हटले विषय नको,
सोप्या चालीचीच कविता करु.

चाल ठरवून झाली तरी,
विषय अजून शोधत आहे.
तो पर्यंत विषय सोडून,
नुसतेच यमक जोडत आहे.

कधी तरी शांतपणे,
पुन्हा एकदा प्रयत्न करेन,
चालीबद्दल नक्की नाही,
पण विषय तरी नीट धरेन.

tujhyat

तुझ्यात.....

सुकलेल्या ओठाला विचार
कहर सरत्या बहराचे
तुटलेल्या ता-याला विचार
श्वास ढळत्या प्रहराचे

सुकलेल्या ओठामध्ये त्या
असा पुन: विरघळलो मी
तुटलेल्या ता-यासम त्या
तुझ्यात पुन: निखळलो मी.

ajun fakta ekdach

अजून फक्त एकदाच

लायब्ररीबाहेरचा पिंपळ असाच,
प्रत्येक संध्याकाळी सळसळून हसतो,
पुस्तकांत तुझ्या आठवणींची जपून पिंपळपानं,
जाळीत त्यांच्या स्वतःला मी गुंतवून टाकतो.

भेलकांडलेल्या पुस्तकांच्या गर्दीत,
विचारांची पानं फडफडत असतात,
काना,मात्रा,वेलांट्यांचं राहत नाही बंधन,
भास तुझेच शब्दाशब्दांत गप्पा मारत बसतात.

झिपऱ्या सावरणाऱ्या माडाच्या कुशीत,
तुझ्यामाझ्या हस्तरेषा नकळत मिसळून जातात,
ओल्या वाळूच्या मिठीतून अलगद स्वतःला सोडवत,
लाटाच आपल्या श्वासांची साक्ष बनून राहतात.

प्रत्येक ओळ लिहून संपल्यावर वाटतं,
शब्दसफर मुकी माझी इथेच आता थांबूदे,
मनाजोगती मांडामांड झाली एकदा अवसानाची,
की सगळं सगळं पुन्हा...अजून एकदाच सांगूदे.

किनऱ्यावरच्या त्या स्वप्नांची का परत उजळणी करायची,
छे! आता वास्तवाचा नवा ऋतूही अनुभवायला हवा,
आयुष्याच्या या वळणावर टाकताना पुढली पावलं,
हात तुझा असाच सतत हाती हवा.

नवे ऋतू, नवी स्वप्नं,
नव्याच दुनियेत आता बागडायचंय,
नवे चटके, नवे काटे,
अश्रूंनाही आता एकत्रच लपवायचंय.

सावली तुझीच पुढ्यात,
कायम माझ्या राहूदे,
अजून फक्त एकदाच बहुतेक हेच सांगायचं आहे,
आरशात जेव्हा बघशील,
दिसेल माझीच प्रतिमा,
श्वासाश्वासात तुझ्या आता असं नांदायचं आहे.

hi raathi adkhalte

ही रातही अडखळते

अवसान सगळे उसने
स्पर्शात एका गळते,
ओठांत सावर सजणा,
ही रातही अडखळते.

श्वासांत बागा फुलती,
मी अंगभर दरवळते,
जागून घे रे सगळी,
ही रातही अडखळते.

नजरेत थोडे कळते,
मौनात उरलेसुरले,
बघ चंद्र मग पाघळतो,
ही रातही अडखळते.

मोहरत काया अवघी
या चांदण्या विरघळती,
दवथेंब पानांवरती,
ही रातही अडखळते.

गुंतून पडले सगळे
वळणांत धागे बघ या,
डोळ्यांत अन ती मिटता,
ही रातही अडखळते.

metamorphosis

मेटामॉर्फॉसिस

जुना फोटो शाळेतला आपला,
बघून लाजरं हसत होतो,
मित्रमैत्रिणी सारखं चिडवतात म्हणून,
बोलायलासुद्धा घाबरत होतो.

कुंचल्यात सदा इंद्रधनु तुझे,
गुणगुणलेल्या गाण्यातून तुलाच फक्त गायचो,
दररोज छातीशी धरून नवी कविता,
शाळेबाहेरच्या बसस्टॉपवर तासन् तास रेंगाळायचो.

शाळेतलं ते फुलपंखी प्रेम(?),
थरथरणाऱ्या हातांनी तुझ्या मनगटावर बांधलं,
एकाच चॉकलेटच्या अर्ध्या-अर्ध्या गोडीसारखं,
"सी प्लस एम्" तळहातावर मेंदीसारखं रंगलं.

साडेतीन वर्षांच्या मोठ्या(?)(!) गॅपनंतर,
आज वागण्याबोलण्यातली मॅच्युरिटी क्षणोक्षण जाणवतेय,
भूतकाळातली ती अल्लड गुलाबी मजा,
आज लाजून लाजून नाही, तर खळखळून हसवतेय.

पहिल्यांदाच तुझ्याबरोबर कॉफी पिताना आज,
काय बोलू नि काय नको असं थोडसं होऊन गेलंय,
बोलते आहेस, हसते आहेस, टाळी देते आहेस तू सुद्धा,
नव्यानं बहरलेल्या मैत्रीनं आपल्या,संकोचाला कधीच पळवून नेलंय.

सोळा ते बावीसच्या या मेटामॉर्फॉसिसची कमाल,
निखळ मैत्रीची अवीट गोडी आज अनुभवतोय,
निरागस तुझं हसणं नि आपल्या गप्पा साठवत साठवत,
समोरची एस्प्रेसो उगाच(?) मिनिटामिनिटाला ढवळतोय.

अशीच तुझ्या हसण्याबोलण्याची पखरण,
गुंफूदे आठवणींच्या माळेत हरेक मोती नवा,
जगण्यासाठी प्रत्येक सेकंदाचा काटा,
अतूट आपल्या मैत्रीचा ताजा श्वास हवा.

maitrin

मैत्रीन

(व्याक्रणाच्या चुका युनिकोडमुळे झाल्या आहेत,प्लीज समजून घ्या.)

एक तरी मैत्रीन अशी हवी,
जरी न बघता पुढे गेलो तरी
मगून आवाज देणारी
आपल्यासाठी हसणारी
वेळ आलीच तर अश्रुही पुसणरी
स्वत:च्या घासातला घास
आठवणीने काढून ठेवणारी
वेळ प्रसन्गी आपल्या वेडया मित्रची
समजूत काढणारी
वाकड पाऊल पडताना मात्र
मुस्काटात मारणारी
यशाच्या शिखरावर
आपली पाठ थोपटणारी
सगळ्यानच्या गलक्यात
आपणास सैरभैर शोधणारी
आपल्या आठवणीन
आपण नसताना व्याकूळ होणारी
खरच! अशी एक तरी जीवा भावाची
'मैत्रीन' हवी आपणास मित्र म्हणवणारी...

hirve paan

हिरवे पान...

कारणाशिवाय छळणा-या संध्यावेळा
आता मला सकारण छळू लागतील,
पुस्तकात ठेवलेल्या पानावरच्या
हिरव्या खूणा गळू लागतील.

ढळू लागेल मनामधून
आठवांची पाकळी एक एक
आवळू लागेल मानेवरून
बंधनांची साखळी एक एक.

एक एक करून विझतील किंवा
विझवले जातील सारे दिवे
अंगणच माझ्या घराचे लावील
परतवून चांदण्यांचे थवे.

हवे होते ते ते मिळाले
गळाले ते तसे नकोच होते
आंबट-गोडाचा प्रश्न नाही
द्राक्षांना हात लागले होते.

होते ठेवले जपून परंतु
पुस्तकात एक हिरवे पान...
त्या पानाच्या जाळीमधे अता
अडकलो मी कायमचा छान!!

kahi charolya

काही चारोळ्या

संध्याकाळच्या रंगीत आकाशात
जेव्हा दिशा भरकटून जातात
पंख फ़ुटलेली स्मृतीपाखरं
घरट्याकडे परतू लागतात

ओठांवर ओठ टेकवताना
भान दुनियेचं ठेवायचं नसतं
तूच तर सांगत असतेस ना, तेव्हा
डोळ्यांनीच डोळ्यांशी बोलायचं असतं

आयुष्यातल्या अशा प्रत्येक संध्याकाळी
वेदनांच्या सावल्या तीव्र लांबू लागतात
तुझ्याच मिठीत येऊन मी मनमुराद रडतो
गाल गोरे तुझेसुद्धा ओले होऊ पाहतात

आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात

चारचौघांमध्ये आठवणी वाटणं
ही भावनांची गुंतवणूक असते
मयूरपंखी रेशीमगाठी क्षणार्धात जुळून येतात
त्यातच त्यांची सव्याज परतफ़ेड मिळते

रात पुनवेची तारे आटून गेले,
प्याले नजरेचे ओठ चाटून गेले.
लाजता तू पुन्हा तशी गुलाबी,
रंग नभी पंचमी दाटून गेले.

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=5774057768239266676

paus

पाऊस. . .

ढगांमध्ये विरून मी तुझ्याच साठी बरसलो,
बरसून आता तुझ्या चिंब ओल्या केसातून निथळलो. . .

हरवून बसताना मी तुझ्या त्या गोड मंद हास्यात
मिसळलो पुन्हा तुझ्या त्याच पाणीदार डोळयात. . .

वाहत जाऊन शितिजापर्यंत मी फ़क्त तुझ्यासाठीच भटकलो
भटकून पुन्हा विरघळून मी तुझ्यासारखाच तरसलो. . .

थेंबाथेंबातून गायलो मी आपल्या पावसाचे गाणे
हिरव्यागार पाउलवाटेवर मन तृप्त होत भिजणे. . .

जळुन पूर्ण उन्हाळाभर, मी आता पावसाबरोबर परतलो
पण धरून तुझा हात हाती, मी फ़क्त ओंज़ळभरच बरसलो. . .

प्रत्येक पाऊस आता तुझ्या-माझ्यासाठीच असेल
अन तुझ्या प्रत्येक पावलाआधी तो मातीला भिजवेन. . .

कदाचित तेंव्हाच जाणवेल तुला की "का मी इतका बेहकलो?"
आणि जाणवल काही तर मी ही म्हणेन "म्हणूनच मी जन्मलो. . . "

- रोहन

ashoka

अशोका. . .

तो खूपदा निघायचा त्या शितिजाच्या शोधात
मागे सोडून ती लक्तरे आठवणीची. . .
पण भटकायची पावले त्या वैशाख वणव्यात
उरायची मागे फ़क्त जाणीव सावलीची. . .

कोणीच नसायाचे वाटेवर. . . एकटाच तो, एकटीच ती धाव
एकसारखीच गर्दी त्या पडक्या कबरीचीं. . .
का जिंकायचंय त्याला ह्या जगाला हरवून?
भेदरलेली कुजबूज मग त्या मुक्या तलवारींची. . .

रोजचंच युद्ध अन रोजचाच तो आकांत
रोजचीच खळखळ आता फ़ुटक्या बांगड्यांची. . .
नांदायची शांतता त्याच्या प्रत्येक पावलाबरोबर
पुसटशी ओळख मग हरवलेल्या श्वासाची

पण. . . . . . . . . . .

एके दिवशी श्वास त्याचाच त्याचाबरोबर रडला
विझवली अश्रुने त्यानं रण्भुमी कलिंगाची. . .
उघडले डोळे. . . तलवार हातुन निसटून पडली
हिच होती सुरुवात त्याच्या सोनेरी विजयाची. . .

अखेरीस जिंकलाच तो. . .जिंकलच त्यानं शितिजाला
उमलली फुल त्याच्या प्रत्येक पावलाशी
आता नव्हता तो एकटा. . .नव्हे एकासाठी त्याची धाव
सापडलेली ओळख एका हरवलेल्या "अस्तित्वाची"

- रोहन

mihi tech pahtoy

मीही तेच पाहतोय...


पावसाच्या थेंबालाही माहित नव्हतं,
तो कुठे वाहतोय...
सहज विचारलं तर म्हणाला,
"मीही तेच पाहतोय..."

thava

थवा ....

जिकडे-तिकडे माणसांचा...
मोकाट सुटलेला थवा आहे.
पण मला थव्यातून जायचं नाही,
माझा मार्ग थोडा नवा आहे.

je bilagale mala

जे बिलगले मला

जे बिलगले मला ते
तुझेच सूर होते
धुके वितळण्याआधी मी
लोटीले दूर होते.

झाडास पालवीचे
उगवणे कळाले नाही
जळाले रानच जेव्हा
डोळ्यांत धूर होते.

जखमेवर फुंकर कशाला
भडकेल अजूनच ज्वाला
निखारे उचलताना
करपले उर होते.

स्वप्नांची रचिली माळ
राउळे जशी ओळीने
प्रार्थनेत संध्याकाळी
रात्रीचे काहूर होते.

apoap

आपोआप

ऋतू बदलतात, चंद्र-सूर्य उगवतात, आपोआप

माणसेही बदलतात, उगवतात मावळतात, आपोआप



तुला सोडून, कधी जाताना दूर, तुजपासून

डोळे पाणावतात, अश्रू दाटतात, आपोआप



हळूच बाहेर, ती डोकावते, खिडकीतून

नजरा मिळतात, बोलत राहतात, आपोआप



नजरेचे तीर तुझिया, घे जरा, आवरुन

खोल शिरतात, घायाळ करतात, आपोआप



कवितेत तुझ्याबद्दल, जातो कधी, लिहुन

चौकशा घडतात, चर्चा होतात, आपोआप



आयुष्याची सापशिडी, नाही खेळायची, अजुन

फ़ासे पडतात, साप-शिड्या गिळ-मिळतात, आपोआप


"वैष्णव जन तो", गेले कुणीसे, सांगून

अर्थ विरतात, तारखा उरतात, आपोआप



संसाराची घडी, गेलीये 'त्याच्या', विस्कटून

येइल तो जगात, कुठल्याशा अवतारात, आपोआप.

-प्रणव

bharat majha desh ahe

भारत माझा देश आहे

महासत्तेच्या वल्गना करणारा आमचा प्रतिनिधी UN मध्ये मूक होतो आहे
सर्वांच्या प्रचारसभेत नागरिक फक्त घोषणा देतो आहे
मी भगवा, मी हिरवा प्रत्येकजण भांडतो आहे
तरीही देशभर तिरंगा दिमाखात फडकतो आहे

बिहारमध्ये लालू यादव निर्लज्जपणे हसतो आहे
संसदेत प्रश्न विचारायला आमचा नेता पैसे घेतो आहे
तरीही 'भारत माझा देश आहे'चा प्रतिध्वनी ऐकू येतो आहे
भयाण अंधार सर्वत्र, भारतमातेचा जीव गुदमरतो आहे

सीमेवर जवान मूकपणे रक्त सांडतो आहे
त्याच्या शवपेटीकेवरही आमचा मंत्री कमिशन खातो आहे
गांधीटोपी घालून कुणीही स्वस्तात देशभक्त बनतो आहे
महात्म्याचा फोटो मात्र 'भवनात' धूळ खातो आहे

किटकनाशकं सापडली तरी कोका कोला अजून खपतोच आहे
बळीराजा मात्र अन्नपाण्यावाचून तडफडतो आहे
मर्डर, धूम हाऊसफुल्ल, स्वदेस मात्र आपटतो आहे
मंगल पांडेच्या जीवनातही चंगळवाद घुसतो आहे

स्वदेशीच्या घोषणा देणारा मर्सिडीजमधून हिंडतो आहे
आमचा कामगार मात्र फाटक्या संसाराला ठिगळं जोडतो आहे
अंगाला लावायचा साबणही विदेशातून येतो आहे
इथला बेकार युवक दाऊद्च्या टोळीत भरती होतो आहे

खलरक्षणाय सदनिग्रणाय पोलिस मनापासून काम करतो आहे
त्याची टोपी धूळ आणि पट्टा गंज खातो आहे
दयेच्या नावाखाली लाखो बांग्लादेशींना आम्ही पोसतो आहे
म्हणूनच निम्मा भारत आजही दारिद्र्यरेषेखाली जगतो आहे

एकेकाळी सोन्याचा धूर निघणारा हा देश विनाशाच्या दलदलीत बुडतो आहे
सोनं सगळं संपलं, आज फक्त धूर निघतो आहे
कशाचीही लाज राहीली नाही, देवही हताश झाला आहे
कारण आमचा गणपती 'कजरा रे'च्या तालावर नाचतो आहे

स्वप्नं सारी भंगली, स्वातंत्र्यसैनिक अश्रू ढाळतो आहे
आम्ही मात्र GRE,TOEFLच्या dates घेतो आहे
हूंदके देते भारतमाता, आम्हा करंट्यांचा धिक्कार आहे
मोहन भार्गव,माधव आपटे ची सर्वार्थानं आज या देशाला गरज आहे.....

jhep

झेप

या आशांचं गाठोडं घेतलेला मी एक प्रवासी
हातात ध्येयाची काठी अन झालो मी अनिवासी
निराशेला नाही स्थान हिम्म्त आहे अपार
मोह माया भुलभुलॆय्या पण नाही आत्मविश्वासाला खिंडार
सूर्य पिउन झालो मी आरक्त समुद्राची ती काय दशा
झाले डोंगर माझ्या ढांगा वारा झाला माझी नशा
उगवत्या सूर्याला करतं हे सारं जग नमस्कार
सुसाट चाललो मी करुणी या ग्रहणावर प्रहार
अंधाराच्या झाल्या ठिकर् या प्रकाश झाला विजयी
विसरलो का मी काही बरोबर कोणी नाही ..बरोबर कोणी नाही...

chhedun ja sakhe

छेडुन जा सखे !!!

मित्रांनो आणि मैत्रिणिंनो ,ही कविता मी लिहीली नाही ,आपल्यात इतकी प्रतिभा असण शक्यच नाही ...
पण मनोगत (http://www.manogat.com/node/3711#comment-34678) वरची ही कविता ,४ स्पंदन चुकवून गेली हे मात्र नक्की !!!


उशाला माझिया
उमले मोगरा
गंध दुलईत
तुझाच बाबरा

श्वासात बेभान
उन्माद कापरा
देहात थरारे
तुझाच नखरा

करात माझिया
लाजते अबोली
होऊनि बेधुंद
मिटते पापणी

माझिया गळ्यात
हार दो करांचा
हलके उघडी
पडदा लाजेचा

स्पर्शाने तुझिया
वणवा पेटतो
बेभान किनारा
नदीला भेटतो

डोळ्यात माझिया
सखे तुझा नूर
जातेस का दूर
लावून काहूर

थांब ना जराशी
ओसरू दे पूर
छेडून जा सखे
एकदाच सूर
-- क्षिप्रा

ek divas asech

एक दिवस असेच

एक दिवस असेच,

सुखद स्म्रुतिन्च्या हिन्दोळ्यावर, स्वच्छन्द झोके घेतना
अलगद एक पीस स्पर्श करुन गेले, अन मनी काहुर माजले

तो हवा हवा सा स्पर्श, ती हवी हवीशी ओढ
तो हवा हवा सा गन्ध, ती अगतिकता बेजोड

सगळे काहि एका क्शणात डोळ्यासमोरुन गेले
अन आपोआप गालावरुन दोन थेम्ब ओघळले

एरवी स्पश्ट पणे दिसणारा तो खिडकीतला चाफ़ा
आज पुसट्पणे बरेच काहि सान्गुन गेला

त्याचा तो रोजचाच सुगन्ध आज कडवट भासला
एक दिवस असेच ...

swapna hi

स्वप्ने ही

स्वप्ने ही
आपलीच असतात
ह्र्दयात त्यांना
जपायची असतात
फुलांसारखी
फुलवायची असतात
घरांसारखी
सजवायची असतात
कारण स्वप्ने
आपलीच तर असतात
रेशीम बंधाने त्यांना
बाधायची असतात
मनातल्या मंदीरात
पुजायची असतात
कधी कधी
अश्रुंच्या पुरात
वाहुन द्यायची असतात
आठवणींच्या जगात कोठेतरी
साकारायची असतात
पुर्ण झाली नाहित तरी
शेवटी स्वप्ने ही
आपलीच असतात
ह्र्दयात त्यांना
जपायची असतात

----स्वप्निल

maitri asavi ashi

मैत्री असावी अशी...

मैत्री असावी अशी... मैत्रीसारखी

हसत राहणारी.., हसवत राहणारी...

संकटकाळी हात देणारी...

आनंदी समयी साद घालणारी...

मनाची कवाडे उघडून डोकावणारी...

काहीं गुपितांचे राखण करणारी...

मन मोकळे करुन सारं सांगणारी...

सांगता सांगता मोहीत करणारी...

कधी कुणाला न लुटणारी...

चांगल्याच कौतुक करणारी...

तितकीच चूका दाखविणारी...

शूध्द सोन्याप्रमाणे चम चम चमकणारी...

maitri mhanje

मैत्री म्हणजे

मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात...

search



premacha artha

प्रेमाचा अर्थ

प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,
ओठान्मधे इतके सामर्थ्य नव्हते,
तुला दूर जातान्ना पाहूनही ते उघडले नाही,
ते फक्त कवितेतच कर्तुत्व दाखवतात.

प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,
तुझ्या डोळ्यासमोर हरले माझे डोळे,
ऎवढ्या सात वर्षातही ते 'चुकले' नाही,
ते फक्त कागदच्या तुकड्यावरच बोलतात.

प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,
माझा स्पर्शही तुला सान्गु शकला नाही,
तुला 'त्या'च्याबरोबर पाहुनही हाताने सीमा राखली होती,
ते फक्त कल्पनेतच जागे होतात.

प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,
माझ्या श्वासही खोटेच बोलत होता,
शरीराचा अन्त पाहुनही ते वळले नाही,
ते फक्त 'पडद्यावरच' वळतात.

तु फक्त 'लाल-हिरव्या कागदासाठी' माझा हात सोडला,
तोच तुला माझ्या प्रेमपत्रापेक्षा जवळचा वाटला,
तेव्हा मीही तो प्रेमाच्या तराजुत तोलला,
आजतर मलाही ह्र्दय हलके वाटायला लागले,

पण आता फार उशिर झाला होता,
प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळला होता...

majha veda paus

माझा वेडा पाऊस

तो पाऊस,
ज़ेव्हा मला भेटला होता ना ,
तेव्हा तो वेडा नव्ह्ता आणि ....
माझाही नव्ह्ता..

तो ,ढ्गांच्या गडगडाटाशिवाय,
आणि भेदरवणा-या वा-याशिवाय कोसळ्णारा,
एक साधा सरळ पाऊस होता...

एकदा त्याने मला भिजवायचं ठरवलं,
मग मीही भिजायचं नक्की केलं!
तशी छ्त्री होती ना सोबतीला..
पण तीचा कधी उपयोग होतो का?

मग तो पाऊस आधी वेडा झाला..
कारण तो थांबायला विसरला..
आणि मग तो माझा झाला
कारण मी मलाचं विसरून भिजत राहीले

भेटायचयं का तुम्हाला त्याला...?
कधी आलातं तर..
त्याच्यासाठीचं बांधलेल्या..
माझ्या मनाच्या चंद् मॊळी घरातं..
बरसताना दिसेल तुम्हाला.....माझा वेडा पाऊस!!!

-Vibha

avadto maj afat sagar

आवडतो मज अफ़ाट सागर

[लहानपणी पाठ्यपुस्तकात ही कविता आपल्याला होती.आजही ही कविता मला संपूर्ण आठवते. कवीचे नाव मला आठवत नाही पण फ़ार छान आहे ...तुम्हाला आवडली तर सांगा.]

आवडतो मज अफ़ाट सागर, अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती, गात किनाऱ्याकडे

मऊ मऊ रेतीत रे कधी मी, खेळ खेळतो किती
दंगल दर्यावार करणाऱ्या वाऱ्याच्या संगती

संथ सावळी दिसती जेंव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

क्षितिजावर मी कधी पाहतो, मावळणारा रवी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी.

vizli vaat

विझली वात

उरला हा दिवस कधी नाही कशात
सरले क्षण असे आतल्या आत
लपवून सारे कसे, जाळू या स्मृतींना
गुदमरून जातो जीव, त्यांच्या धुरात

नव्हते जे माझे, असे काही गमावले
तोरण आठवणींचे दारा, मनाच्या लावले
दूर जाण्याचाही मी केला सण साजरा
बडवून ढोल-नगारे, ह्या माझ्या उरात

दिवसाला आता थांबवणे नाही
पावसाला पुन्हा नाही बोलावत
उडवून चार शब्द, दहाहीं दिशांना
गातो कहाणी मी, विरल्या सूरांत.....

nava marg

नवा मार्ग

भिरकावून दिली जुन्या यशाची घोंगडी
उतरूनी रणी वार सोसण्याची गोडी
अपवाद ठरूनीच नवे विक्रम बनतात
वाट धोपट सोडून मीही रानाकडे दौडी

झाले नाही आधी असे काही करायाचे
सूर्य केव्हाच बुडाला म्हणून नाही झोपायाचे
त्याच्या उगण्याची मीही वाट न पहावी
माझ्या उदयाची तोही घालेल साकडी

असे करणार काही, उन्हे पायांशी टेकावी
कूजगोष्टी करण्यां घरां पाखरे धावावी
चंद्र-तार्यांनीही यावे, नभातून खुणवावे
इच्छाशक्ती ज्याचा सुर्य, अशा त्याची ती झोपडी...

bhar dupari

भर दुपारी

भर दुपारी निघून गेलीस

तेव्हा तुझ्या अंगावरचं

नितळ मुलायम झुळझुळीत पिवळं वस्त्र

झगझगीत उन्हाबरोबर फडफडत राहिलं

कितीतरी वेळ...

तुझ्या प्राजक्तविभोर आठवणी

संध्याकाळच्या कातर क्षणांना

सांगू लागलो अंगणात

तेव्हा, आधीचेच कललेले

चाफ्याचे झाड

अजून जरासे कलले

एक दीर्घ नि:श्वास टाकत...

रात्रीच्या भव्य पटावर

तुझे नक्षत्रांकित डोळे

चांदण्यांमधे

सर्वत्र दिसले.

सर्वत्र दिसले

त्यात लपलेले माझे प्रतिबिंबही...



आणि त्यानंतर अता

ही अशी पहाट उगवली आहे सखे -

तुझ्याशिवायची...

दिवसाचा प्रदीर्घ रस्ता तुडवताना,

जर कधी श्रमलोच,

तर तुझ्या अंगावरचं

नितळ मुलायम झुळझुळीत पिवळं वस्त्र

फक्त फडफडत राहू दे माथ्यावरून...बस्स.

mala mi sangu asa vatato

मला मी सांगू असा वाटतो .....

मला मी सांगू कसा वाटतो
थेंब थेंब जसा रोज साठतो
शब्दास शब्द, हाकेस हाक, कधी नि:स्तब्ध राहतो
जीवनपूजेचा रोज असा मी प्रसाद वाटतो ॥

टाळीला जेव्हा टाळीही मी देतो
खांद्यालाही खांदा सहज मी जुळवतो,
कमवून मित्र अनेक, कधी एक गमवतो
तेव्हा ओढ्यात बसून डबक्यात पाहतो

मला मी सांगू असा वाटतो .....

कधी कुणी भावनांचा वसंतही देतो
तरी पालवी न फुटता, मी मैत्रीतच खुजतो
कधी डोळ्यात नकार साचतोच फार
तेव्हा बरसूनी, इंद्रधनु दिसल्याचा आव आणतो

मला मी सांगू असा वाटतो .....

रोज स्वप्नांच्या यादीसवे मी निघतो
काही गाठतो,काही खोडतो,काही पुन्हा लिहीतो
तरी सायंकाळी मी उरे इतुका एकटा
की एकांतही मजला सोडून जातो

मला मी सांगू असा वाटतो .....

kasli bara vaat pahto ahe mi

कसली बरं वाट पाहतो आहे मी??


कसली बरं वाट पाहतो आहे मी
स्वतःलाच फसवून जगतो आहे मी

काय करायचय नी काय टाळायचंय
सगळंच तर कळतंय
कुठेतरी आत मात्र काहीतरी जळतंय
विझवायचं सोडून तेल ओततोय मी

कसली बरं वाट पाहतो आहे मी...


समोरच तर दिसताहेत आकाक्षांचे डोंगर
तिथेच तर जायचंय
एकटाच जाऊ म्हटलं तर तेही सलतंय
हातावर हात ठेवून कुणासाठी बसलोय मी

कसली बरं वाट पाहतो आहे मी...

शब्द, सुख, शब्दसुख, दुःख, वेड, दुःखवेड
मीच तर माझ्यासाठी आणलंय
तेवढंच कसंबसं पुरेल तिथपर्यंत पोहोचायला
उगाचच भागीदार शोधत बसलोय मी

कसली बरं वाट पाहतो आहे मी...

maitri

मैत्री

इथे जन्मताच सर्व नाती जुळतात
कुणी काका,कुणी मामा आपोआप बनतात
याला अपवाद मात्र मैत्रीच नातं
ते सर्व जण स्वतःच शोधतात....

baaget

बागेत

सांज झाली,दिवे लागले
पक्शी घरट्यात परतले
बागेत तुझी किती वाट पहिली
पण तू का नाही आली

बागेत एक कळी उमलली
लोकांचीही गर्दी वाढु लगली
अनेकांची जोडी जमली
पण आपल्या जोडिची कमी रहिली

बागेत रतराणीचा सुवास सुटला
चंद्रमाचा प्रकाश पडला
आकाशात ता-याची गर्दी झाली
नव्या जोडीची गट्टि जमली


बागेत उमललेलि कळी फ़ुलली
त्याचबरोबर तुझी एन्ट्री झाली
तुला बघतच पापणी स्तब्ध झाली
आणि ओठातून निघले hi रुपाली

बागेतलि जनत मज़्यकदे बघु लागली
मझी नजर मात्र तुझ्यावरच रहिली
जेव्हा तू मझ्यापाशी येऊन थांबली
आणि सर्वाच्या ओठातून निघाले व्ह!कय ही जोडी!!!

patang

पतंग


ऐक पामरा खेळ पतंगाचा काय तूला सांगतो
खेळ मनाचा कसा खेळावा हेच तूला दावतो ॥

उगाच शंका,हेवे-दावे,भूत-भविष्य नी खुळ्या कल्पना
पतंगास जसे अडथळे तशाच जनांच्या वल्गना

मार्ग तयातून ज्यास लाभला तो पतंग नभी संचरतो(२)

ऐक पामरा ... ॥

पराक्रमी असुनीही मज विनयातच उत्कर्ष शोभतो
कणा जो व्यर्थ गर्वी लढला, सहज तया वारु मोडतो

नमूनी कणा पतंग स्वार वारूवर होतो(२)

ऐक पामरा ... ॥

दोराला मज काच लावुनीच मी नित्य उंच जातो
खेळ नव्हे संघर्ष असे हा,रोज मृत्यु नाचतो

जो दक्ष तोच भाग्यवान या जगी ठरतो(२)

ऐक पामरा ... ॥

jevha mi konich nasto

जेव्हा मी कुणीच नसतो...


जेव्हा मी कुणीच नसतो -
निराकार सावल्यांप्रमाणे
क्षितीजावरती लोंबत असतो,
अंधाराच्या मागे लपुनी
शिळा हॊउनी आंबत असतो.

बुरशीलाही बुरा यावा अन
गंजालाही चढावा गंज,
किड्यांच्याही डोक्यात घुमावी
भणभणणारी झांज.

अशी गजबज होता मस्तकी
चित्ताला ये जरा शांतपण,
या शांतीच्या माथ्यावरि पण
नश्वरतेचे घण चिरंतन .

जेव्हा मी कुणीच नसतो -
असण्याचा सारे काही
अर्थ अचानक सुटू लागतो,
या नसण्याचा त्या असण्याशी
संबंध भराभर तुटू लागतो.....

tav nayanache dal halale

तव नयनाचे दल हलले

तव नयनाचे दल हलले ग
पनावर्च्या दवबिन्दुपरि जग सगळे डळमळळे ग
तव नयनाचे दल हलले ग

वारे गळले तारे ढळले
दिग्गज पन्चाननसे वळले
गिरि ढासळले, सुर कोसळले
ऋषि मुनि योगि चळले ग
तव नयनाचे दल हलले ग

ऋतुचक्राचे आस उडाले
आकाशातुन शब्द उडाले
आवर आवर आपुले भाले
मीन जळि तळमळले ग
तव नयनाचे दल हलले ग

ह्रिदयि माझ्या चकमक जडली
दो नयनान्ची किमया घडली
नजर तुझी धरणीला भिडली
पुनरपी जग सावरले ग
तव नयनाचे दल हलले ग.....

Wednesday, June 11, 2008

kshan gelele

क्षण गेलेले


क्षण गेलेले कधीच येणार नाहीत परतून,
मात्र आठवणी त्यांच्या राहतील सदैव मनात घर करून ..

आनंदाचे क्षण काही, काही क्षण दुःखाचे ..
दूर जाताच आठवती क्षण सारे सोबतीचे ,

क्षण बालपणीच्या हट्टाचे, कॉलेजमधील मौजमजेचे..
समाधानाचे क्षण आणि काही कठीण प्रसंगाचे.

सरकतात डोळ्यापुढे जेव्हा भरून येतात डोळे,
वाटते फिरून यावेत आयुष्यात पुन्हा ते क्षण सारे !

prematla godva

प्रेमातला गोडवा

कसे सांगू तुला मी की तू माझा कोण आहेस
तू आयुष्यात असण्यानेच आयुष्याला माझ्या अर्थ आहे

तुझं अस्तित्त्व हेच आता माझं अस्तित्त्व झालंय
तुझ्या सुखदुःखातच माझं सुखदुःख सामावलंय

तुझ्या माझ्यात एक असं गोड नातं फुललंय
तुझ्याशिवाय जगणंही आता कठीण होऊ लागलंय

जीवनात कधी न यावा या नात्यामधे दुरावा
असाच राहो कायम हा प्रेमातला गोडवा !!!

tu hi kadhi majha jhala astas tar

तूही कधी माझा झाला असतास तर !!!


माझा जीव गुंतला होता फक्त तुझ्यात ..
पण.. तुझाही कधी गुंतला असता तर !

मला नेहमीच हवा होतास तू जवळ..
पण.. तुला ही कधी असं वाटलं असतं तर !

माझे ह्रुदय हाक देत रहिले तुला ..
पण.. तुझ्या ह्रुदयानेही साद दिली असती तर !

सर्वस्व माझे दिले मी तुला
पण.. तूही कधी माझा झाला असतास तर !!!

manatil shabdanchi fulpakhre

मनातील शब्दांची फुलपाखरे

मनातील शब्दांची फुलपाखरे हळूच कागदावर उतरली ...
आणि बघता बघता एक कविता जन्मास आली !

कविता जणू वाटत होती एखाद्या तान्ह्या बाळासारखी !
नुकतीच या अनोळखी जगात पाऊल ठेवलेली,
आपल्या अस्तित्त्वाचा शोध घेणारी ...

मग वाटू लागली ती एखाद्या नववधू सारखी ,
थोडीशी बावरलेली, थोडीशी संकोचलेली...
आपण लोकांना आवडू की नाही या विचारात रमलेली !

कधी कविता वाटते जवळच्या मैत्रिणी सारखी,
आपल्या सुखात व दुःखात सहभागी होणारी ...
आपल्या भावना समजून घेणारी !

शेवटी प्रत्येक कवितेला असतं एक स्वतःचं व्यक्तिमत्त्व,
ती ही शोधत असते सगळ्यांमध्ये आपलं वेगळं अस्तित्त्व !!!

naati

नाती

नाती असतात किती विचित्र आणि मजेशीर !!!

काही अगदी जवळची,
तर काही अशीच वरवरची...

नाती काही क्षणातच जुळणारी,
तर काही अनेक वर्षातही न जाणवणारी...

काही नात्यांना देता येत नाही नाव,
तरीही ती असतात खूपच खास !

काही नाती ह्रुदयात घर करून रहणारी,
दूर राहूनही कधीच न तुटणारी...

मात्र काही नाती तुटल्यानंतरही,
जन्मभर आठवत राहणारी ........

pahilya pausat bhijtana

पहिल्या पावसात भिजताना,
त्या रोमांचित एकांतात
नजरेनेच म्हणालास ....
जवळ ये अशी जरा ... मिठीत घेतो सामावून
दोघांची मनंही जरा चिंब होऊ देत ना भिजून

बुडालेच होते आकंठ तुझ्या प्रणय सागरात मीही
मग कशी म्हणू शकले असते तुला " नाही "

वाराही खट्याळ झोंबत होता अंगाला
राहिलेच नाही मग अंतर दोघांत जरा

सरींवर सरी ओघळती गालावरी
नजर तुझी खिळली अधरांवरी

लाज लाजूनी मी पुरती अशी मोहरले
विसरूनी सारे काही तुझ्या बाहूपाशात हरवले

आता तू नसताना .........
राहून राहून सारे आठवते
भिजलेले क्षण ते मोरपिशी
पुन्हा ह्रुदयी साठवते !!!!

to swapni ala

तो स्वप्नी आला

तो स्वप्नी आला
गोड गाली हसला
मलाच माझ्यापासून
दूर घेऊन गेला

एकदा अचानक
समोर आला
गुपित सारे ह्रुदयातील
सांगूनी गेला

मग रोजच
स्वप्नी भेटू लागला
माझ्या रात्री मग
जागू लागल्या

दूर असूनही
अगदी जवळ होता
माझ्या स्वप्नीचा
राजकुमार होता

आता तो जवळ आहे
आता तो माझा आहे
पण आता पहिल्यापेक्षा
दूर गेला आहे ....................

orkut prem

प्रेम करायला तुझ्या साठी ORKUT

प्रेम करायला तुझ्या साठी ORKUT वर येत असतो
प्रेम करायला तुझ्या साठी ORKUT वर येत असतो
COMMUNITIES मधल्या कविता पाहत असतो.
तुझ्या साठी मराठी कविता शोधत असतो

FRIEND भेटला की थोडा वेळ SCRAPPING करत असतो
सकाळ पासून संध्या काळ पर्यंत ऑनलाइन असतो
तुझ्या साठी मराठी कविता शोधत असतो

कधी ऑफिस चे काम तर कधी क्लाइंट्स चे फ़ोन
किती ही कामात असलो तरी ORKUT वर ऑनलाइन असतो
तुझ्या साठी मराठी कविता शोधत असतो...

मला ही कोणीतरी भेटेल orkut वर .....
भेटल्या वर खुप कविता सांगायला
scrap वर खुप गप्पा मारायला
एका वेगळया रितीने प्रेम वक्त करायला...

orkut वर माझ्या कड़े खुप चांगले मित्र आहे
पण मित्रान मधे तुजी उणिव जाणवत आहे....

indradhanushya

@@@ इंद्रधनुष्य @@@


आयुष्याच्या एकाकी वळणावर ...
तू असा अचानक भेटलास,
कळलेच नाही कधी झाले,
मैत्रीचे रूपांतर प्रेमात.

प्रेमाची मोहक दुनिया पाहण्याचा
मोह मनाला होताच,
पण वाटले नव्ह्ते कधी ...
स्वप्नंही येईल प्रत्यक्षात.

स्वप्नातील राजकुमार अचानक
असा समोर येईल,
प्रेमाच्या जादुई नगरीत
आपल्याबरोबर घेऊन जाईल

आगमनाने तुझ्या...
आयुष्यच माझे बदलले,
रखरखीत ऊन्हात जसे,
सप्तरंगी इंद्रधनुष्य फुलले !!!

virahacha uun

विरहाचं ऊन

ढग दाटताच तुझ्या आठवणींचे,
मन आभाळा सारखं भरुन येतं ...

जसा पावसासाठी चातक पक्षी,
तसं मन तुझ्या भेटीसाठी आतुर होतं...

विरहाच्या उन्हात कोमेजलेलं मन,
तुझ्या सहवासातील वर्षावाच्या जाणीवेने फुलुन येतं...

मोर जसा पावसाच्या स्वागतासाठी पिसारा फुलवून नाचू लागतो
माझंही मन तुझ्या दर्शनाने असंच आनंदाने बहरतं ...

तुझ्या प्रितीच्या सरींमध्ये भिजून...
मन धरती प्रमाणे हिरवंगार होऊन जातं,

मात्र पावसानंतर जेव्हा तेच विरहाचं ऊन पसरतं...
वेडं मन पुन्हा एकदा तुझ्या भेटीची वाट पाहू लागतं !!!

tujha sahvaas

### तुझा सहवास ###

तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण
जणू अनमोल मोत्यासारखा....

तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण
ह्रुदयात जपून ठेवण्यासारखा...

तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण
हवाहवासा वाटणारा...

तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण
मन मोहवून टाकणारा...

तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण
वाटे कधीच संपू नये...

तुझ्या सहवासात मी असेच स्वतःला
विसरून जावे !!!

bhavna ya virun gelya sarya

भावना विरून गेल्या साऱ्या .............

भावना विरून गेल्या साऱ्या, शब्द सारे गोठून गेले ...
कळले नाही तुला मला, अकल्पित हे कसे घडले !

फुलांवरून चालता चालता, काटे पायात असे रूतले ...
हसू ओठी फुलण्याआधी, डोळ्यामध्ये अश्रू तरळले !

प्रेम तुझे मिळावे मला, एवढे माझे भाग्य कुठले..
साथ तुझी लाभावी मला.. स्वप्नं हे स्वप्नंच राहिले !

premachi kavita

कविता करायला प्रेमात
पडावंच लागतं असं नाही
गुलाबाचा वास घ्यायला ते
खुडावंच लागतं असं नाही

मी जे बोलतोय ते तुम्हांस
कदाचित खरं वाटत असावं
मलासुद्धा हे असंच बोलणं
थोडसं बरं वाटत असावं

तरीसुद्धा सांगतो असं नसतं
असं कधीच होत नाही
पाखरू बनल्याशिवाय आपणांस
उडता कधीच येत नाही

माझ्यासारखे काही जण मग
कवितेसोबतच जगतात
प्रेमात हरल्यावरही काही जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर प्रेमामुळेंच
वेड्यासारखं वागतात !!!

phule shikavtat

फुले शिकवतात......

फुले शिकवतात......
गुलाब सांगतो,
येता जाता रडायचं नसतं,
काट्यात सुध्दा हसायचं असतं;

रात रानी म्हणते,
अंधाराला घाबरायचं नसतं,
काळोखात ही फुलायचं असतं;

सदाफुली सांगते,
रुसुन रुसुन रहायचं नसतं,
हसुन हसुन हसायचं असतं;

बकुळी म्हणते,
सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,
गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;

मोगरा म्हणतो,
स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,
सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो;

कमळ म्हणतो,
संकटात चिखलात बुडायचं नसतं,
संकटांना बुडवुन फुलायचं असतं.......

athvun pahaycho mi kahi pausale

आठवून पाहायचो मी काही पावसाळे

आठवून पाहायचो मी काही पावसाळे
तिच्या-माझ्या संगतीत भिजलेले
हवेभोवती गंध घेवून
रानोमाळ पसरलेले. . .

आठवायचा अवचीत मग तो नदीकाठ
कमळ फुलांनी बहरलेला
चांदणीची वाट पाहत मग
तो चंद्र रात्र जागलेला. . .

जाणवायची नकळत मग ती बोचरी थंडी
गुलाबी स्वप्नातून जागवणारी
नुसतीच मग एक निरर्थक धडपड
अपूर्णततेही पूर्णत्व शोधणारी. . .

आठवून यायची, तीची सारी वचने
अशीच कुठेशी मोडून पडलेली
प्रतिसादांना शोधणारी तीची प्रत्येक हाक
नियतीने माझ्यापासून दूर लोटलेली. . .

दाटलेलं धुकं मग सावकाश पाझरायचं
ओल्या होवून जायच्या तिच्या सगळया "आठवणी"
एखाद-दुसरां मग त्या चुकार थेंबानी
उगीचचं भरुन यायची माझी गोठलेली "पापणी"......

kaljatun dhabdhaba ghongavto dinraat ahe

काळजातुन धबधबा घोंघावतो दिनरात आहे


झिंगलेल्या यात्रिकाला वादळाची साथ आहे
शोधला नाही कधी कोठे नदीचा काठ आहे

शीड फ़ुगलेले असे भरदार छाती फ़त्तरी
दोरखंडासारखा पिळदार तोही ताठ आहे

येऊ दे ज्वालामुखी लाव्हा किती अंगावरी
मार्ग त्याने आखलेलाही 'तसा' भन्नाट आहे

आडवा येईल जो होईल पुरता आडवा
हीच त्याच्या पौरुषाने बांधली खुणगाठ आहे

मागतो तुमच्याकडॆ त्याची विनंती खास ही
पिंगळावेळेस सांगा 'माझीही तुज साथ आहे'

झेप घे गरुडा तुझा तू वाढ्वी रे हौसला
जो कुणी ना जिंकला चढणार तू तो घाट आहे

नाम गुम जाये तो जाये काय पर्वा काळजी
काळजातुन धबधबा घोंघावतो दिनरात आहे....

nishabd

निशब्द


मी दिल्या शब्दा असंख्य हाका शब्द ना मागे वळला कधी
शब्दासाठी झाहलो शब्द्खुळा शब्द ना मज मिळाला कधी
शब्द सकाळ, शब्द मध्यान, शब्द सांज, शब्द निशा कधी
मी गाळली असंख्य आसवे पण शब्द माझा ना पाझरला कधी.

शब्दासाठी हा सारा प्रयास पण शब्दा तो ना कळला कधी
शब्दासाठी हा धडपडता प्रवास पण हात शब्दाने ना धरला कधी
शब्द सागर शब्द कीनारा शब्द वारा मग शब्द वादंळ कधी
मला मिळाल्या असंख्य ठेचा पण शब्द माझा ना ओघळला कधी.

शब्दात माझा जिव गुतंला पण जिव शब्दचा ना जडला कधी
मी लिहील्या असंख्य कविता पण शब्दा त्या ना कळळ्या कधी
शब्द जिवन शब्द संसार शब्द अस्तिव्त शब्द कविता कधी
झालो मी आज निशब्द कवि पण शब्दा हा कवि ना कळला कधी.

आज जिवन माझं प्रश्नचिन्हं पण शब्दास हा प्रश्न ना पडला कधी
शब्दाच्या ओजंळीत श्वास माझा शब्दाने हा जिव ना सोडला कधी
शब्द साउली शब्द आधार शब्द आयुश्य शब्द सर्वस्व कधी
शब्दासाठी मी नेहमी शून्यच होतो पण हा शब्द मी ना खोडला कधी.......

kon to mrutyuch ka

कोण तो मृत्युच का...

कोण तो मृत्युच का
आम्हास आला न्यावया
ठेवलाहे प्राण सज्ज
आम्ही तयाला द्यावया
चल निघुया लोक जमतिल
अश्रु कोरडे ढाळावया
बागेतील अमुच्या फ़ुले तोडतील
प्रेतावर अमुच्या वहावया

tujhyavarach prem karto ahe

तुझ्यावर प्रेम करतो आहे...........

तुझ्याच अथ्वानिवर जगतो आहे

तुझ्या डोळ्यात हरवतो आहे

तुझ्या केसात गुर्फततो आहे

तुझ्यावर प्रेम करतो आहे...............

तुलाच प्रत्येक मुलित शोधतो आहे

तुझ्या विरहात तल्मल्तो आहे

तुझ्या सोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवतो आहे

तुझ्यावर प्रेम करतो आहे.....................

तू दाखावलेल्या स्वप्नात रंग भरतो आहे

दोघांनी उभ्या केलेल्या नात्याला जीव लावतो आहे

तुझ्यावर प्रेम करतो आहे....................

"तू माझी नाही होणार" या वाक्यशिच मी झगड़तो आहे.....

माझ्या मनालाच मी सम्जव्तो आहे

तरीही तुझ्याताच माझे श्वास अदाक्तो आहे

तुझ्यावर प्रेम करतो आहे...........................

तुझ्या स्पर्शताच मी गुर्फततो आहे

मृत्युच्या दारात मी जातो आहे

तुझ्या हाताच्या विलख्यत जीव सोडतो आहे

क्षण क्षण आता मी मारतो आहे

तुझ्यावराच प्रेम करतो आहे.........................

chukunach

चुकुनच...

स्वप्नरुपी बागेत माझ्या चुकून तू येशील का,
चुकून माझा हात सखे तुझ्या हाती घेशील का ?
चुकुनच माझ्या मनासागारात स्वछन्द तू न्हाशील का,
चुकुनच माझ्या प्रेमाची काबुली तू देशील का ??

haslo mhanje

हसलो म्हणजे…

हसलो म्हणजे सुखात आहे असे नाही,

हसलो म्हणजे दुख:त नव्हतो असे नाही!!



हसलो फक्त स्वत:च्या फजितीवर,

निर्लज्यागत दिली होती स्वत:च ताळी!

हसलो कारण शक्य नव्हते दूसरे काही,

डोळ्यात पाणी नव्हते असे नाही!!



हसलो कारण तूच म्हणाली होती कधी,

याहून नवे चेह-याला काही शोभत नाही!

हसलो कारण तुला विसरने जेवढे अवघड,

तितके काही गाल प्रसरने अवघड नाही!!



हसलो कारण दुस-यानाही बरे वाटते,

हसलो कारण ते तुला खरे वाटते!

हसलो म्हणजे फक्त उगवली फुले कागदी,

आतून आलो होतो बहरुण असे नाही!!



हसलो कारण बत्तिशी कुरूप आहे,

खाण्याची अन दाखवन्याची एकच आहे!

हसलो कारण सत्याची मज भिती नव्हती,

हसलो कारण त्यावाचुन सुटका नव्हती !!!

kautuke sangu naka

कौतुके सांगु नका


कौतुके सांगु नका आम्हास मैफ़ीलींची
थोरवी आम्हास आहे ह्रुदयातल्या गीतांची
गरज आम्हा नव्हती कधीही "प्यायच्या" नशेची
सवय आम्हा नेहेमीच आहे इष्कात झिंगण्याची......

Tuesday, June 10, 2008

virahachya ya jagaat

विराहाच्या या जगात
असच काही होत असते
बाहेर कुणी हसत असते
आत कुणी रडत असते

काटयांनी भरलेल्या वाटेवर
मूकाटयाणे चालTयचे असते
पायाला रुतला जरी कटा
फुलाचा स्पर्श दाखवायचे असते

मग नको असते ति पहाट
नसते आपली ति सायंकाळ
उरतो फ़क्त आपल्या हक्काचा
रक्तबंबाळ करणारा भुतकाळ

पण ते मला मान्य आहे
तो तुझ्या सारखा ह्रदय मोड़त नाही
कितीही वेदना दिल्या तरी
मला एकटे सोडत नाही...

सर्वे ह्रदय तोड़णारे ऐकून घ्या
तुमचाही कधी हाच हाल असंणार आहे
रडाल जेव्हा तुम्ही तेव्हा
आम्ही सर्व हसणार आहे

त्या हसू मागे किती अश्रु आहेत
तेव्हा तुम्हा लोकांना कळणार आहे
याल धावत तुम्ही आमच्या बाहुत
अणि आम्ही मागे वळणार आहे

पण खरं प्रेम करणारे
कधीच असं नाही करू शकत
कितीही स्वतः रडले तरी
त्या डोळ्यात अश्रु नाही बघू शकत

त्या पणावलेल्या डोळ्यांना मग
आपल्या हास्याने सुकवायचं असतं
मन कितीही रक्त रडले तरी
चेहर्यावर हसू उम्लायचं असतं

विराहाच्या या विश्वात
असच सारे जगत असतात
बाहेर कुणी हसत असतात
आत सर्वे रडत असतात ...

आत .....
सर्वे .....रडत असतात ...

malahi pahaychay ekda prem karun

मलाही पहायचय एकदा प्रेम करुन !


शेजारच्या आळीत तिच्यासाठी थांबून
स्वःताच्याच सायकलची स्वःता हवा काढून
पॅंडल हलवत मग बसायचय रेंगाळुन..
...टाकाणारे तिला आज सर्व काही सांगून.


दुरुनच बघायचय तिला चाकां आडून
विचारलं की सांगायचय पंक्चर झाली म्हणून
चालायचय सोबत मग सायकल हातात धरून..
...विचारणारे तिला आता योग्य संधी बघून.


शब्दांनी राहायचय जिभेवरच चिकटून
बोलताना तिच्याशी जरा जायाचय गोंधळून
बोलायच तिनेच मग माझ्याकडे हसून..
"...कुणाचा रे विचार करतोयस तू अजून?"


नकळत त्या शब्दाने पडायचय घसरून
पहायचय तिने मग माझ्याकडे चमकून
मी मात्र तिच्या नजरेला चुकवून..
...काय रे झाल हे माझ्यकडुन चुकून?


तेवढ्यात एका सरीने टाकायचय भिजवून
हातातली छत्री झटकन उघडून
माझ्यावर धरत तिनं म्हणायचय लाजून..

"...पहायचय रे मला एकदा प्रेम करून !"

ekahi kavita tila kalat nahi

एकही कविता तिला कळत नाही !!!

ति माझ्याशी बोलायची
रोज गोड़ हसायची
मी रागात असतांना
स्वतःशीच मात्र रुसायाची

तिच्या रोजच्या गमती
मला रोज संगायची
मी त्यावर हसलो नाही तर
लटकेच फुगुन बसायची

मी लिहलेली नवी कविता
रोज भांडून मागायची
वाचल्यावर मात्र शांतपणे
माझ्या कड़े पहायची

एकदा म्हणाली ति ......
तू माझ्यावर का कविता करत नाही ???
तेव्हा कळल मला
एकही कविता तिला कळत नाही !!!

aai

आई!!!


आई, तुला एकदाच हाक दिली तरी अब्जांनी धावून येशील
आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या
अस्तित्वाचं इथे नांदणं आहे
संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे

आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा

आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां
तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस
सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी
तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची

एकदा जरासं कुठे खरचटलो
आई, किती तू कळवळली होतीस
एक धपाटा घालून पाठीत
जख्मेवर फुंकर घातली होतीस

जख्मं ती पुर्ण बुजली आता
हरवून गेली त्यावरची खपली
तो धपाटा, ती फुंकर, ती माया
ती हरेक आठवण मनात जपली

आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी

आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही

आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील........

maitri aste kashi

मैत्री असते कशी, लोणच्यासारखी?
हो हो लोणच्यासारखी. मुरत जाते, जुनी झाली की...
मैत्री असते कशी, दुधावरच्या सायीसारखी?
हो हो सायीसारखी. घट्ट होते वेळ जा‌ईल तशी.
मैत्री असते कशी, बासुंदीसारखी?
हो हो बासुंदीसारखी, गोडी वाढते आटवाल तशी.
मैत्री असते कशी, फोडणीसारखी?
हो हो फोडणीसारखी. लज्जत येते जीवनाला तडतडली तरी.
मैत्री असते कशी, मीठासारखी?
हो हो मीठासारखी. नसेल तर हो‌ईल जीवन अळणी........!!!!

hallichya pori

हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत
इश्श…" म्हणुन मान खाली घालतच नाहित,
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

"नविन ड्रेस का ग?" विचारले तर ह्यांना येतो संशय
"नाहि रे जुनाच आहे", म्हणुन बदलतात विषय
नकट्या नाकावर लटका राग दिसतच नाही
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

मी घा-या डोळ्यांचे कौतुक करावे
मग तिनेही खुदकन हसावे
कशाचे काय….आजकाल गालांना खळ्या कशा पडतच नाहि
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

उद्या घोड्यावर होऊन स्वार येईल एक उमदा तरूण
होशिल का माझी राणी विचारेल हात हातात घेऊन
गोड गॊड स्वप्ने यांना आता पडतच नाही
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

पोर लग्नाची झाली म्हणुन, घरी आई-बाप काळजीत
"माझा नवरा मी कधीच शोधलाय" त्या डीक्लअर करतील ऎटित
घरून होकारासाठी कधी थांबतच नाहित
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत.....

prem kuthehi karava

प्रेम कुठेही कराव.

प्रेम शाळेत कराव.

प्रेम कॉलेजात कराव.

प्रेम वर्गात कराव.

वाटेत जात जात कराव

प्रेम बागेत कराव.

घोड्यान्च्या पागेत कराव.

प्रेम पवित्र असते तेव्हा ते

देवळच्या रान्गेतही कराव

रिकामी मिळाल्यास कुठ्ल्याही जागेत कराव

प्रेम कुठेही कराव

प्रेम समुद्राकाठी कराव

प्रेम खडकापाठी कराव

फ़ुटणाऱ्या लाटान्ना साक्शी ठेवुन

फ़क्त परस्परान्साठी कराव

प्रेम नावेत कराव

प्रेम हवेत कराव

आणि महत्वाचे म्हणजे परस्परान्च्या कवेत कराव

प्रेम कुठेही कराव

बसस्टॅन्ड वर करु देत नसतील तर

एस टी स्टॅन्ड वर कराव

एस टी येईपर्यन्त कराव

प्रेम करण्याजोग बाजुला कोणी बसल

तर एसटीतही कराव

प्रेम माडीत कराव

काळ्या काचान्च्या गाडीत कराव

शेजारीच प्रीती मिळत असेल तर

आपल्या वाडीतही कराव

प्रेम कुठेही कराव

प्रेम नैसर्गिक असत

म्हणुन ते झाडाखाली कराव........

ti jevha bolte na

ती जेव्हा बोलते ना...

ती जेव्हा बोलते ना मनातून
शब्द व्हावंसं वाटतं
ती जेव्हा चालते ना जनातून
स्तब्ध व्हावंसं वाटतं

ती हलते पानातून, मी वारा होतो
ती फुलते नभातून, मी तारा होतो
ती जेव्हा रुसते ना माझ्यावर,
ओंजळीच्या उशीत घ्यावसं वाटतं
ती जेव्हा रडते ना अनावर,
आई बनून कुशीत घ्यावसं वाटतं

ती झुलते पंखातून, मी पारवा होतो
ती गाते प्राणातून, मी मारवा होतो
ती जेव्हा सजते ना माझ्यासाठी,
तीळ बनून गाली उरावसं वाटतं
ती जेव्हा झुरतेना ना माझ्यासाठी,
काळजाला सुखात पुरावसं वाटतं

ती होते नदी, मी किनारा होतो
ती होते थंडी, मी शहारा होतो
ती जेव्हा येते ना अंधारातून,
विझून जावंसं वाटतं
ती जेव्हा येते ना पाऊस घेऊन,
भिजून जावंस वाटतं

ती पडते दवातून, मी कळी होतो
ती हसते गालातून, मी खळी होतो
ती जेव्हा वाटते ना मधासारखी,
भ्रमर व्हावसं वाटतं
ती जेव्हा असते ना माझ्याबरोबर,
अमर व्हावंसं वाटतं

ती होते ह्रदय, मी स्पंदन होतो
ती देते हात, मी बंधन होतो
ती जेव्हा मरते ना माझ्यासाठी,
तेव्हा जगावसं बाटतं
ती जेव्हा उरते ना प्रेम घेऊन,
तिला बघावसं वाटतं........

pranay

प्रणय

लाडके गाल थरथरले आज
चुंबनांचे हलके गाज
नशा उसळेल प्रितीची अन
श्वासांमधे भिनतील श्वास

चेहरा तुझा ओंजळीत
स्वर्गच जणु झोळीत
दोघांमधे अंतर शुन्य
प्रणयाच्या स्पर्शाची आस

बंधने सुटतील जगाची
ओठांवर भाषा ओठांची
गंध तुझ्या त्या श्वासांचा
सत्य म्हणू की सुवर्ण भास

मोगरा झुरतो वेणीशी
रातराणी अंगणाशी
सारे गंध फिकेच आज
दरवळतो तुझा सुवास

देह विखुरले देहात
गुज कोठले डोळ्यात ?
पुरे जरीही वाटत असले
सोडवु नको हा समास ..

संतोष (कवितेतला)

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=4083262603134355633

tu baraslis tevha

तु बरसलीस तेव्हा...
तुझ्या माझ्या भेटीला
आज मेघही तयार झाले,
घनकाळ्या आभाळातूनी
उगाच बरसायला निघाले...

दामिनिचे तांडव उगाच आज,
तुझ्या माझ्या मिलनाला सुरू झाले,
वार्‍याच्याही मंदगतीला कुणास ठाऊक,
सुसाट्याचे वेग आले...

भास्करही गेला लपून
काळ्या काळ्या ढगाआड,
अन उजेडाचे रानही
काळोखाने पळवून नेले..

आता वरुणराज बरसणार,
गार गार शहार सरींना घेवून,
पुन्हा एकदा खट्याळ होणार,
तुझ्यामाझ्या देहाला भिजवून..

तू जराशी आसरा सोडूनी
चालू लागलीस माळरानी,
मग तुला पाहूनी केली सुरुवात
जोरात बरसायला त्यानी..

चिंब ओलं तुझं भिजण,
पदर सावरत केसाना सावरण,
पावसांच्या सरींना ओंजळीत घेवूनी
अलगद माझ्यावर शिंपडण..

तुझी भिजलेली काया,
ओल्या प्रेमाची गुलाबी मोहमाया,
अता मला ही जळवत होती,
अन तुझ्या ओल्या श्वासांची दोर मलाही खेचत होती..

पावसाच्या विदाईने केला कहर,
तुझ्यामाझ्या देहस्पर्शाला छेडायला
आली त्या पवनराजाची ,
लाडावलेली शीत लहर..

शहार्‍याच्या या देहमिलनात,
तु ओठांच्या कंपातुन शहारत होती,
जणू आपल्या प्रेमात गुलाबी होऊनी,
तुच माझ्या अंगवळणी बरसत होती...

-- अनामिक-साहील..
(email - anamiksahil@gmail.com)

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=4889351366933810022

maitri keli ahes mhanun sangavasa vattay

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=14147025790776367730

chandane jhelte aj angavari

चांदणे झेलते आज अंगावरी
चंद्र हा सांगतो
सांगतो बातमी
चांदण्यातून गं
चालले आज मी

चंद्र हा सांगतो…

देऊनी वीज मी
घेतले चांदणे
सर्व माझ्या मनाचे
असे खेळणे
काय गेले “कुठे ?”
घेतले काय मी
चांदण्यातून गं
चालले आज मी

छंद माझ्या मनी
चांदण्यांनी दिला
सूर माझ्या गळी
केवडा माळला
शब्द देते “कुणी”
मांडते तोच मी
चांदण्यातून गं
चालले आज मी


चालताना हसे
ही झुळुक छानशी
बोलता ऐकतो
मेघ आसुसशी
मागुती कोण “हे”
घेत आधार मी
चांदण्यातून गं
चालले आज मी

चंद्र हा सांगतो
सांगतो बातमी
चांदण्यातून गं
चालले आज मी

गीत : स्वरांगी देव
संगीत : स्वरांगी देव
मीटर : शोधिशी मानवा राउळी मंदिरी

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=12625674364979040941

pakhre parat yetil saaj talun gelyavar

पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर

पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर
मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.

होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर
भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.

झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर
कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर
कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर
तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर.

आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर
पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर
तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी
पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर.

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=18115086806871990337

preyasichi kunkavani sajte lalaat

प्रेयसीची कुंकवाने सजते ललाट

आयुष्याच्या प्रवाहा मध्ये
क्षणाक्षणाला माणसं भेटतात
काही फक्त विसरण्यासाठीच
काही भेटल्यासारखी वाटतात

काही थोड्या अधिक कालांतराने
आठवणींच्या पकडीतून सुटतात
काही प्रदिर्घ कालांतराने
नकळत स्मरणातून मिटतात

अचानक एखादी व्यक्ती भेटते
जिच्याशी मैत्री करावीशी वाटते
आयुष्याच्या प्रत्येक समयी
तिची सोबत हवी हवीशी वाटते

आठवणींच्या वेलीवर तेव्हा जास्त
तीचीच फुलं फुलू लागतात
रात्रभर मग तिच्या स्वप्नांच्या
हिंदोळ्यावर झोके झुलू लागतात

कधी कधी तर स्वप्न चक्क
दिवसा येऊन बोलू लागतात
हास्याची इवली इवली फुलं
चेहऱ्यावर अवेळी डोलू लागतात

मग सुरू होतो भेटी गाठीचा
हवाहवासा वाटणारा खेळ सारा
ग्रीष्म, धगधगत्या पळत्या जिवावर
बरसतात मग काही शीतल गारा

स्वप्नांच्या हळव्या सुर्यकिरणांची
इथूनच सुरू होते कोवळी पहाट
आप्तेष्टांच्या झेलून अक्षतांच्या चांदण्या
प्रेयसीची कुंकवाने सजते ललाट

@सनिल पांगे

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=4384258184818894974

athwanincha paus

"आठवणींचा पाऊस", __संतोष आणी अम्रॄता

काही केल्या आठवण तुझी
आल्या नंतर जात नाही..
इतका तुझा होतो मी,
की, माझाच मी राहात नाही..

संतोष (कवितेतला)
_________________

आठवण येते तुझी
आणी मेघ बरसतात
पापण्यांमधुन कसलेसे
झरेच वहातात

अमॄता (कवीतांची)
_________________

आठवण बनुन येतो पाऊस
सरी मागे ठेउन जातो
भिजवतो जरी वरुन तरी
आतुन काही घेउन जातो

संतोष (कवितेतला)
_________________


आठवणींच्या सरींचा देखील
राग असावा
मेघ-मल्हार पावसाचाच एक
भाग असावा

अमॄता (कवीतांची)
_________________


आठवण जरी आली तुझी
मी अश्रु ढाळीत नाही
पाउसच असतो तो..
मी आसवे गाळीत नाही ..

संतोष (कवितेतला)
_________________


तु दुर गेलास की
आठवण तुझी गडद होते
गालांवरुन अश्रुंची
नदी अधीक भडक होते..

अमॄता (कवीतांची)
_________________

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=4083262603134355633

kadhi kadhi asa hota

कधी कधी असही होत

कधी कधी असही होत.
आपलास वाटणार कुणी
आपल्याला परक करत
नेहमी साथ देणार कुणी
अर्ध्यावर सोडून जात

कधी कधी असही होत
नेहमी गोडीने बोलणार कुणी
नजरेतुन विष ओतत असत
मयेच्या त्या शब्दानी आता
गंजेच रूप घेतालेल असत

कधी कधी असही होत
डोल्याताले अश्रु पुसनारा हात
आपण आपल्यावर उठाताना पाहतो
त्या नाजुक नात्यानाही आता
कलाची वालवी लगाल्यासरखा वाटत

कधी कधी असही होत
प्रेम अणि द्वेष शब्दाना
सरख महत्व उरत
आपलस वाटणार कुणी
खुप परक झालेल असत

क्षणाचा हा नशिबाचा खेळ असतो
त्यात आम्ही मात्र
कतपुताल्या म्हनुनाच नाचावल जात असतो
असा जेव्हा होत खुप एकत वाटत
तरी पण जगण मात्र असतच

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=8006853621677555406

tu

तू


कधी कधी शब्दान्हून तू
हसतान्ना जास्त बोलकी वाटतेस,
कधी कधी हसण्यात तुझ्या
सुरेल शब्दांची मैफिल दाटते.

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=1076790199255972772

priti

प्रीति


अशीच यावी वेळ एकदा
स्वप्नी सुद्धा नसतान्ना
असच नेहमी तू बहराव
माझ्या समीप असतांना

असेच रंग घेउनी यावी
दररोज माझ्या जीवनी तू
अन त्याच रंगात रंगून जावी
इन्द्रधनुची कन्या तू

असाच यावा गंध मातीचा
घेउनी चाहुल वासंताची
मग बहरावी ही प्रीति
तुझ्या न माझ्या प्रेमाची

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=1076790199255972772

premat padlyavar

प्रेमात पडल्यावर काळात... की
एक घडी , एक क्षण हे किती मोठ असत ते.
थाम्ब आलेच मी एका मिनिटांत
अस म्हानानार्या तिचा तो एक मिनिट
त्याला एका जन्मापेक्शाही मोठा वाटतो
त्याचा जन्म सम्पयाला अल तरी
तो 'त्या' एका मिनिटाला
पूर्ण होण्याची वाट बघत असतो

नेहमीच तिच्या वाटेवर नजर लॉन
तो त्याचा प्रत्येक क्षण , प्रत्येक जन्मासरखा काद्हत असतो
ती मात्र एकाच म्हणते
थाम्ब आलेच मी एका मिनिटांत.

तरीही 'त्या' मिनिताची गोदी गुलाबी
तो आवाडिने हर घडिला चाखतच असतो
खरच प्रेमात पडल्यावर या 'एका' क्षनाची, मिनिटाची , घडिची,
खुप मोठी किम्मत चुकवावी लागते ,'हे फ़क्त त्यालाच कलते!!!

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=1076790199255972772

ekach hoti akanksha majhi

एकच होती आकांक्षा माझी

एकच होती आकांक्षा माझी
तिला फ़क्त मिलावन्याची
विचारान्याची मात्र धस्ती वाटली

तिच्या "त्या" स्मिता मूले हिम्मत केली
पण समोर आल्यावर भ्रांत पडली
ह्रुदयातली जगा भरपूर होती
पण मुम्बई मध्ये नाही मिळाली
अशाश्वत असल्या नोकरीमुलेच ती
मनात माझ्या कोंडली गेली

तिने चांगल्या नवरयासाठी व्रते केली
आम्ही मात्र तिच्या सुखासाठी प्रार्थना केली
सर्वस्व त्यागले तिला प्रेमापोटी
पण मैत्रिचीही खून दूर तिने सारली

अनेक वर्षे लोटली
अशीच एकदा दिसली
प्रेमाने संसार करत होती
ह्रुद्याच्या तुकद्याने त्या
ओलाखाही दाखवली नाही
आता मात्र ओलख दाखावयालाही
पैसे लागतात ही जाणीव मात्र झाली

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=8006853621677555406

jhalis jari parayi

झालीस जरी पराई
भेटलीस अशी अनाठाई
बावरलीस जरी बघून मला
मन तुझे सुने आहे
आजही डोळ्यातील तुझ्या
भाव मात्र जुने आहे.

बदललीस जरी तू दुनियेसाठी
विरह आलेला माझ्याच वाटी
डोळ्यात पाणी अन् गालावर खळी
असे तुझे जिने आहे
आजही ओठांवर तुझ्या
नाव मात्र जुने आहे.

बहुतेक हिच प्रेमाची परीक्षा आहे
खरं प्रेम करण्याची ही शिक्षा आहे
माझं तर उघड उघड पण तुझं
लपुन अश्रू पिने आहे
आजही गालावर तुझ्या
घाव मात्र जुने आहे.

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=8565519669230155031

prem ani computer ved

प्रेम आणी computer वेड

वर्गात नेहमी खुन्नस देता देता
दिलीस एकदा सुन्दर smile
उघडशील का माझ्या "pritee"ची
एक एक Backup File.

जेव्हा तुला पहातो तेव्हा
hang होते माझी hard Disk
माझी OS ही सांगते मला
घेतली आहेस मोठी Risk.

Risk Management क़ेलेय मी
Estimate ही काढला आहे.
थोडे Reengineering करावे लागेल
तुझा माझा समेट एवढा एकच पर्याय आहे.

फक्त एकदाच पहायचे आहे
तुझ्या ह्रुदयात Login करुन
Delete करायचेत सगळे Folder
फक्त माझ्या नावाचा Folder राखुन.

Antivirus बनेन तुझ्यासाठी
वाचवेन तुला Spam पासुन
एकच mail कर माझ्या mailवर
वाट बघतोय कधीपासुन.

म्हणणे फक्त एवढेच आहे
आशा करतो तुझी इच्छा ही असावी
कोणी visit द्यायचे म्हटले
तर तुझी माझी URL एकच असावी.......

---केतन दिक्शीत

tu asshilhi kadachit nashhilhi

तु असशीलही कदाचीत नसशीलही ..

तु असशीलही कदाचीत नसशीलही ..
एक ओळ असावी मात्र, तुझ्यासोबत लिहिलेली
कधीतरी नकोसं झाल की
खोल कुशीत घेणारी..
तु असशीलही कदाचीत नसशीलही
एक श्वास असावा फक्त, तुझ्यासोबत घेतलेला
माझा बंद पडला तर
काळजामधुन वाहणारा..
तु असशीलही कदाचीत नसशीलही
एक स्पर्श असावा तुझा फक्त, हळुवार हातांचा
जगाने दिलेल्या जखमांवरुन
मलम होऊन फिरणारा..
तु असशीलही कदाचीत नसशीलही
एक दाद असावी तुझी फक्त, माझ्या कवितेला दिलेली
शब्दच सुचणार नाहीत तेव्हां
नवी आशा देणारी..
तु असशीलही कदाचीत नसशीलही

पण आतुन एक हाक मात्र कायम असेन तुझी
काळीज चिरुन टाकणारा विरह असेनच तुझा
आणि त्या घावानंतरही
तुझ्यासाठी वाहणारी वेदना असेन..
तितकीच जिवंत आणी ताजी.. तुझ्या स्पर्शासारखी
आणी मागे असेन मी,
आपण मिळुन केलेल्या काही कविता, आणी
बोभाटा करणारी नवीन दाद.. माझ्या कवितेला ..
कुठेतरी मात्र ..
तु असशीलही कदाचीत नसशीलही ..

अमॄता (कवीतांची) ..

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=10703366906592358936

ata fakta tujhi athwan urli ahe bas

आता फक्त तुझी आठवण उरली आहे बस....

आता फक्त तुझी आठवण उरली आहे बस....
एकांतात कधी,
एकटी असताना जनवाते
की तू कुठे आसपास आहे.
मी वळून बघितल्यावर ,
मात्रा कुणी नसत,
असतता फक्त त्या पाऊलखुणा,आणि
ते रस्ते जिथे आपण हातात हात घालून फिरायचो,
आता रस्त्यावरी फक्त मी असते फक्त एकटी ,
एकटी काहीतरी शोधत असते..,
मला माझ्याकडे बघताना ही तूच दिसतोस...,
मी मलाच कुठेतरी हरवून आलेय..,
मला शोधता शोधता मग कळत,
आता फक्त आठवण उरली आहे बस.

मग तू नाहीस हे जेंव्हा जाणवत मला,
मन अगदी उदास होऊन जात,
त्या अंधर्या रात्री त्या ढगात जाऊन लपत.
मग एक तारा मला म्हणतो,
की तू का अशी एकटी एकटी आहेस..,
तू का फक्त सोबत असावास म्हणुन शब्दांशी बोलतीये..,
माझ्यावर प्रश्नाचा वार होत असतो,
मन कुठेतरी मात्र जळत असत तुझ्यातच ,
पण त्या तार्यचा प्रत्येक प्रश्न,
मला निशब्द करून सोडतो.
मग परत मी मला शन्ब्दान्मधे मोड़ते...
उघड़ते जेव्हा जुने पुराणे लिहिलेले,
तेव्हा प्रत्येक पानावर प्रत्येक शब्दात मला तूच दिसतोस...
प्रत्येक शब्द जेंव्हा माझ्या ओठाना स्पर्शून जातो ,
तेंव्हा जाणवत,
आता फक्त तुझी आठवण उरली आहे बस....
आता फक्त तुझी.........

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=7282833916201546472

prayatna

प्रयत्न

हार झाली आहे तुझी म्हणून तू रडू नकोस
प्रयत्न करायचे मात्र तू कधी सोडू नकोस
पडून पडूनच मूल शिकत उभे रहायला
चुकुन चुकुंनच शिकायचे आसते जीवन जगायला
कोणी किती ही हिणवले तरी ध्येय तू सोडू नकोस
हार झाली आहे तुझी म्हणून तू रडू नकोस
पडायचे प्रसंग तर येणारच चालताना
किटक ठोकरी लागणार मार्ग नवा शोधताना
कोणी किती ही फसवले तरी तू काही थांबू नकोस
हार झाली आहे तुझी म्हणून तू रडू नकोस
चुकणार तर आहे स च नवीन मार्ग शोधताना
ध्यानात ठेव प्रत्येक खूण मात्र तू चुकताना
विचार कर पुन्हा पुन्हा मार्ग तू चालताना
अडकलास जरी कोठे तरी शांत तू बसू नकोस
हार झाली आहे तुझी म्हणून तू रडू नकोस

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=4025714827765754049

majhya baapala radtana pahilay

माज़या बापाला रडतांना पाहिलय....

माज़या बापाला रडतांना पाहिलय....
"बाप"
शांत चेहरा, ना शब्द काही,
डोळ्यात प्रेम साठलेले,
तो मजसंगे नेहमी डोळ्यांनीच बोलत राहिला.
मी नेहमी त्याला कठोर समजायचो,
दुखी झालो की आईच्या कुशीत लपायचो,
तो मात्र मज़ साठी स्वतःचे रक्त विकत राहिला.

स्वतःच्याच हातून ,मी त्याच्या,
स्वप्णाना तुटतांना पाहिलय,
होय, मी आज...
माज़या बापाला रडतांना पाहिलय.

आई,मला सायकल हवी,
आई म्हणायची बेटा पैसे नाही,
दुसर्या दिवशी माज़या हातात चावी असायची.
मी आई ला बीलगायचो,आई ही मला कुर्वळायची,
पण तिच्या डोळ्यात खिनता असायची,कारण
त्या सायकलमागे,त्याने त्याची भाकरी सुधा त्यागलेली असायची.

मला हसतांना पाहून ,उपाशी पोटाने ,
मी त्याला शांत हसतांना पाहिलय,
होय ,मी आज... माज़या बापाला रडतांना पाहिलय.

मोठा झालो खर्च वाढला,
मी ही बाकींच्या सारखा मज्जा करायचो,
सिनिमा पहायचो,मुलीसोबत फीरायचो,
छान स्टाइल मधे सिगरेट फुकायचो,
पैसे कमी पडलेच तर आईला मागायचो.
तो थरथरणार्‍या हातानी राब राब राबायचा,
मळलेला कुर्ता फाटलेले धोतर,
पण कधीच मला काही कमी ना पडू द्यायचा.

त्याच्या निघणार्‍या प्रत्येक घामाच्या थेंबात,
माझाच विचार आणि माझेच सुख पाहिलय,
होय, मी आज... माज़या बापाला रडतांना पाहिलय.

तो जळत राहिला वात बनून,
माज्या जीवनातला अंधार दूर करण्यासाठी,
मी मात्र त्याचे अंग नि अंग नोचले,
स्वतःचे शॉक पाणी पूर्ण करण्यासाठी,
चुक कळली मला,
त्याच्या स्वप्णाना पूर्ण करावसं वाटतय,
त्याच्या पायावर डोके ठेवून रडावसं वाटतय.
पण, आज तो या जगात नाही.

तरीही....
माज़या प्रत्येक संकटात,
मी त्याला माझा विश्वास बनून उभा राहतांना पाहिलय
होय, मी आज...
माज़या बापाला रडतांना पाहिलय.

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=9868283296392135496

najra najar jhali an ti nighun geli

नजरा-नजर झाली अन् ती निघून गेली...................

सकाळची गर्दी होती
स्टेशन वर मुंगिलाही जागा नव्हती
नेहमीच्या सवईप्रमाणे मला
7:32 ची लोकल पकडायची होती

बॅग चिलखताप्रमाणे लावून
जणू युद्धचीच चालली होती तयारी
काही करून खिडकीच पकडायची
पण रांगेत होते एकाहून एक अनुभवी भारी

ट्रेन ची वाट पाहता पाहता
सहज नजर बाजूला वळली
त्या रुपवातीला पाहून
माझी नजर क्षणार्धात भुलली

कोण?कुठली ? नाव?गाव?
ह्या प्रश्नांना पुर्णविराम मिळाला
ती अनोखी षोडशा पाहून
माझा तर फडशाच पडला

त्यादिवशी पहिल्यांदाच खरी
प्रेम भावना निर्माण झाली
प्रेमाची आयुष्यातील किंमत
तेव्हाच मला कळली

गर्दीतल्या शेकडो लोकांमधून
तिने मला पहावे एकदातरी
ही अशक्यप्राय आशा घेऊन
लोकांचे धक्के खात होतो बारी-बारी

तिच्याशी एका नजरा-नजरेसाठी
मी शेकडो ट्रेन सोडायला तयार होतो
स्वता:चे भान हरपलेला मी
त्या सौंदर्याचा शिकार होतो

अखेर तिच्याशी नजर भिडली
कान बधिर् होऊन हृदयाची हूरहुर वाढली
क्षणार्धाची घटना मनात घर करून गेली
नजरा-नजर झाली अन् ती निघून गेली.......................

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=18291330646328819166

nehmich vatta

नेहमीच वाटत.....

नेहमीच वाटत कोणीतरी आपलस व्हाव्
सुखदु:ख् वाटुन घेणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत माझ्यावरही प्रेम करणार कोणी असाव्
ह्रदयात सामावून घेणार कोणीतरी आपल असाव्

नेहमीच वाटत बागेत भेट्णार कोणीतरी असाव्
प्रेमाने गुलाबाच फुल देणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत हातात हात घेणार कोणीतरी असाव्
लढ्ण्याची प्रेरणा देणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत माझीही आठवण काढ्णार कोणीतरी असाव्
आठवणीत माझ्या प्रेमपञ पाठ्वणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत सुखात माझ्या सुख मानणार कोणीतरी असाव्
मी रडत असतांना डोळे पुसणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत प्रेमान हाक मारणार कोणीतरी असाव्
माझ्यासाठीही गाण म्हणणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत संकटात धीर देणार कोणीतरी असाव्
अपयशातून यशाकडे नेणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत आपल्यासाठीही कोणीतरी जगाव्
आयुष्यभर साथ देणार कोणीतरी आपल असाव्

नेहमीच वाटत माझ्यावरही प्रेम करणार कोणी असाव्
मलाही आय लव्ह यु म्हणणार कोणीतरी असाव्
*****विकास्*****


http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=14327401678467431783

ek charoli manatli

ek charoli manatli.......

ओंढक्याखालुन नदी

संथपणे वाहत होती

नीरोप मी देत होतो

ती खंतपणे पाहत होती

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=2950543222861838591

manapasun ti khup avadte mala

*********मनापासून ती खूप आवडते मला******

मनापासून ती खूप आवडते मला

तिच्या मनातलं, पण माहीत नाही

मी दिलेल्या फुलांपैकी एकही फुल

तिच्या हृद्याच्या वहीत नाही


श्वासाहून जास्त तिचे विचार येतात

ती विचारांच्या भानगडीत पडत नाही

म्हणते "मी भावनांच्या कुशीत गवसते"

पण विचारांच्या मिठीत सापडत नाही


डोळे तिचचं चित्र रेखाटतात

तिच्या डोळ्यांचं सांगू शकत नाही

दिसतो तिथे अधून मधून तसा

पण काजवा होऊन चमकत नाही


प्रत्येक स्वप्नात ती हजेरी लावते

तिच्या स्वप्नांचं सांगता येत नाही

समुद्राच्या वाळूत घर बांधायला

अजून तिचं मन तसदी घेत नाही


कदाचित तिच्या प्रेमात मी बुडतोय

ती बुडत असेल पटत नाही

दोघांच्या मनात एकसारखी क्रिया

घडत असेल असं वाटत नाही

@सनिल पांगे

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=4384258184818894974

fakta ekda tari tula

फक्त एकदा तरी तुला
मनापासुन हसवायचंय,
दोन क्षण का असेनात्या निखळ हास्यात,
स्वतःला हरवायचंय...

फक्त एकदाच मला तुझ्या डोळ्यांत,
नजरेला नजर मिळवत बघायचंय,
डोळ्यांमागचं वादळ मला,
अनाहुतपणे अनुभवायचंय...

फक्त एकदातरी मला,
तुला प्रेमाने जवळ घ्यायचंय,
नाहीस जगात ह्या तु एकटी,
हेच तुला समजवायचंय...

फक्त एकदा तरी तुला,
माझ्यासाठी बेचैन होताना पाहायचंय,
त्यासाठी मला तुझ्याशी,
एकदा खोटं खोटंच भांडायचय...

मग मला तुझ्यासाठी,
एकदाच विदुषक व्हायचंय,
तुझा तो लटका राग मला,
चुटकीसरशी पळवायचंय...

तुझा हात मात्र मला,
आयुष्यभरासाठीच पकडायचाय,
प्रेम करतो किती तुझ्यावर,
हेच तुला सांगायचय...

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=3019425528527725324

chaatak

चातक


एकदा निघालो मनाशी ठरवुन
प्रश्नान्बरोबर अन्धार घेउन
अत्युच्च सुख ते कोणते?
काय माझ्या सुखाची परिसीमा?

कुबेराकडे गेलो त्याने धन दिले
इन्द्राने अप्सरा दिल्या
गन्धर्वानी माधुर्य दिले
पण माझे मन रितेच!

सुर्याने तेज दिले
चन्द्राने शीतलता दिली
फ़ुलानी सोदर्य दिले
मग मेघानीही आसवे गाळली
पण माझे मन ते रितेच

आईने जन्म दिला
प्रुथ्वीने जीवन दिले
वारयाने साथ दिली
आकाशाने छत्र दिले
पण माझे मन रितेच

म्हाणुनच
अजुनही मी शोधतो आहे
रानोमाळ हिन्डतो आहे
निसर्गात आत्मा धुन्डाळीत
आणि माझ्या सुखाची परिसीमा....

मग तो वळवाचा पहिला पाउस
ओल्या मातीचा सुगन्ध
हिच माझ्या सुखाची परिसीमा
अद्वितीय, अनन्त.......

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=9046647316642895995

mi nasen tar 2

तिचे बोलणे ऐकून तो जरा... अस्वस्थ झाला. त्याच्या चेहे-यावरचा तो भाव तिला काही निराळाच भासला. क्शणातच त्याचा राग गायब झाला होता. त्याच्या डोळ्यातच तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले... हसून त्याने तिला विचारले.....आता तुझी पाळी....

तो : तुझ्या आयुष्यात मी नसेन तर....
आता तू सांग कशी जगशील??
हाताच्या रेषांमध्ये कोणाचे नाव शोधशील?
आरशात पाहून कोणाच्या विचाराने लाजशील?
खिडकीत लपून कोणाच्या येण्याची वाट बघशील?
कोणाला आपल्या गप्पांमध्ये गुंतवशील?

एकाकीपण जेव्हा खायला येईल,
निरभ्र आभाळ जेव्हा अचानक भरून येईल,
गड्गडाटाने जेव्हा सौदमिनी गरजेल....
तेव्हा सांग कोणाला बिलगशील??

गप्पांचा ओघ ओसरू लागताच..
तू नकळत काही बोलून जाताच...
सांग स्वत:ला कशी आवरशील?
जखमी मनाला कशी सावरशील?

चांदण्या रात्री अर्धचंद्र पाहताना
कोणाच्या आठवात गढशील?
सुखाच्या आठवानेही तू
टपोरे अश्रू पाघळशील...
एकटीच स्फ़ुंदत बसशील..
किती वेळ तरी....

मैत्रिणींना एका "मैत्रिणीची" गोष्ट सांगताना.......
तू हळवी होशील...रडशील.
आठवशील फक्त मला...
बाकी सारे विसरशील.

माझी जाणीव हवा तुला करून देईल,
माझा भास छाया तुला करून देईल,
पाहशील जेव्हा झोपाळा एकाकी झुलताना,
माझा आभास श्वास तुला करून देईल,

लक्श कुठेही लागणार नाही,
चंचल चित्त स्थिरावणार नाही
स्वत:चे अश्रू कसोशीने तू दडशील,
मनात मला लपवून "नोर्मल" जगशील,
तुझ्या मनाचा रिक्तपणा कोणालाही कळणार नाही,
तू असेच दिवस रेटत जाशील...
सांग काय करशील?

तिच्या गोंधळलेल्या चेहे-यावर कोरलेले उत्तर त्याला उमजले..........
आणि त्यांचे ते भांड्ण...... असेच विरून गेले!!!

- प्रियांका
http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=327343623620105831

mi nasen tar

एकदा त्याचे आणि तिचे भांडण झाले.तो तिच्यावर रागावून बसला.तिने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला.
पण तो काही ऐकेच ना! शेवटी रागाने ती ही म्हणाली.."मी आहे तर इतका रागावतो आहेस,मी नसेन तर काय करशील?"

मी नसेन तर
ती : तुझ्या आयुष्यात मी नसेन तर सांग कसा जगशील?
कोणाच्या डोळ्यात स्वत:ला बघशील?
कोणाच्या आसवांना टिपशील?
कोणाच्या निरर्थक गप्पांमध्ये रमशील?
कोणाच्या ओठावर हासू फ़ुलवशील?
कोणावरून मित्रांमध्ये मिरवशील?

बाईक ची मागची सीट जेव्हा रिकामी राहील,
समोरचा आरसा ही जेव्हा माझी वाट पाहील,
ट्राफ़िकचा गोंगाट ही जेव्हा शुल्लक वाटेल,
ती १० मिनिटेही एका तपासारखी भासतील,
सांग तेव्हा काय करशील?

कामात बुड्वून जरी घेशील स्वत:ला,
माझी आठवण येताच...
मोबाइलवर लक्श नकळत जाईल,
पण तो वाजणार नाही...
तुला काहीतरी चुकचुकल्यासारखे नक्की वाटॆल...
सांग तेव्हा काय करशील?

मी नसेन तर ...
तुला चित्रपट रटाळ वाटेल...
सुन्दर धुनही बेकार वाटेल...
पुस्तकही नाराज वाटेल....
मनातून नक्की तळमळशील..

दिवसभर दुस-यांच्या चाणाक्श नजरेपासून लपशील...
उगाच किना-यावर माझी वाट बघशील...
संधीकाळी हुरहुरशील...
माझ्या आठवाने बेचैन होशील..
पण अलगद आपले दु:ख पिऊन टाकशील...
मावळत्या सूर्याला आपल्या अश्रूंचे अर्घ्य देऊन...


गर्दीतही एकटा राहशील,
पुन्हा पुन्हा मागे पाहशील,
मी नजरेस पडणार नाही...
हताश होऊन जड पावलांनी पुढे चालशील..
तू ही त्याच गर्दीत हरवून जाशील.....कुठेतरी...

तू लाख स्वत:ला रमवशील,
दुस-यांमध्ये स्वत:ला हरवशील,
नवीन ना्त्यांना जोडशील....पण
खरच सांग .........
"काय मला विसरू शकशील???"

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=327343623620105831

jevha tujhi athwan khup khup daatun yete

जेव्हा तुझी आठवण खुप खुप दाटून येते

जेव्हा तुझी आठवण खुप खुप दाटून येते,
नेमकी तेव्हाच तू कशी माझ्याजवळ नसतेस?

रिमझीम रिमझीम पाऊस असतांना,
हिरवळीची झालर असतांना,
दूर दूर पर्यंत कुणीही नसतांना,
तुझी आठवण खुप खुप दाटून येते!
नेमकी तेव्हाच तू कशी माझ्याजवळ नसतेस?

निरभ्र आभाळी चंद्र असतांना,
थंड वारा अंगी झोंबतांना,
भर रात्री चंद्राने माझ्यावर हसतांना,
तुझी आठवण खुप खुप दाटून येते!
नेमकी तेव्हाच तू कशी माझ्याजवळ नसतेस?

समुद्र किनारी सायंकाळ असतांना,
सुर्याचे तेज पाण्यात विरघळतांना,
लाटांनी एकमेकांवर आदळतांना,
तुझी आठवण खुप खुप दाटून येते!
नेमकी तेव्हाच तू कशी माझ्याजवळ नसतेस?

जून्या आठवणींत झूरतांना,
तुझे नी माझे किस्सॆ आठवतांना,
तुझ्याशीवाय दूसरं काहीच सुचतं नसतांना,
खरचं तुझी आठवण खुप खुप दाटून येते!
आणि नेमकी तेव्हाच तू माझ्याजवळ नसतेस!

- तॊशिष
http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=12876051108223228591

mi ahe hi ashi ahe

मी आहे ही अशी आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या...
अगदी एखाद्या कवीतेसारखा,
आवडली तर ऐका नहितर नीघून जा...
कुणालही सांगणार नाही,
जबरद्स्ती तर मुळीच नाही,
समजले पटले तर करा नाहीतर विसरून जा...
तुम्ही जगताय ते योग्य अन् मझ जगण अयोग्य,
जरा असही जगून बघा निश्फळ वाटल तर नावं ठेवा...
तुमच्या आध्यात ना मध्यात ना मझा कुणाला त्रास,
कशाला उगीच वैतागताय कशाला उगीच सन्ताप्ताय...
करावस वाटलं तर एकच् करा मी जागतेय तस मला जगू द्या....
का नवं ठेवता उगाच मी करतेय ते मला करू द्याम्हणूनच म्हणते....
मी आहे ही अशी
आहेपटले तर घ्या नाहीतर सोडून द्या

kay sangu majhyabaddal

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
पानात पडेल ते खाल्ल्या शिवाय
पोटच आमच भरत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बोलायच खुप असत मला
पण बोलणं मात्र जमत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुखवल जात आम्हाला
दुखवता आम्हाला येत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
खोट खोट हसता हसता
रडता मात्र येत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुःखात सुख अस समजता
दुःख ही फिरकत नाही.

pahile na mi tula

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले...

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले

हिमवर्षावातही कांती तव पाहूनी
तारका नभातल्या लाजल्या मनातूनी
ओघळले हिमतुषार गालावर थांबले

का उगाच झाकिसी नयन तुझे साजणी
सांगतो गुपित गोड स्पर्श तुझा चंदनी
धुंद या तुझ्या मिठीत देहभान हरपले

मृदूशय्या टोचते, स्वप्न नवे लोचनी
पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
रुप देखणे बघून नयन हे सुखावले

jagava mhantoy

जगावं म्हनतोय

लहान होतो, मोठा होन्याची वाट बघायचो
भविष्यात तरी स्वछंद जगता ये ईल
म्हनून वर्तमानात सगळयांच्या
सांगन्याप्रमाने जगायचो.

प्राथमीक मधुन हायस्कुल मध्ये गेल्यावर
काळा चश्मा घालुन फ़िराव म्हनतोय
एवढं वर्ष झालं की,
स्वःताच्या मनाने जगावं म्हनतोय

द्हावीच्या अभ्यासाचे चटके बसु लागले
गाँगलचे नाव काढल्यावर फ़टके बसु लागले
निदान दहावी झाल्यानंतर तरी
एखाद्या दुचाकीने फ़िराव म्हनतोय
एवढं वर्ष झालं की,
स्वःताच्या मनाने जगावं म्हनतोय

बारावीचं आयुष्यातील मला महत्व पटु लागलं
दुचाकी चं स्वप्न आपोआप डोळ्यातून हटू लागलं.
पुन्हा मोठ्या आशेने बारावीनंतर एखाद्या
बाईकवर फ़िरावं म्हनतोय
एवढं वर्ष झालं की,
स्वःताच्या मनाने जगावं म्हनतोय
दहावी झाली बारावी झाली
डिग्रीचं टेंशन सुरू झालं
बघता बघता वडीलांचही पगार
जाउन पेनशन सुरु झालं
डिग्री झाल्यावर तरी एखद्या
मैत्रिनीसोबत फ़िरवं म्हनतोय
एवढं वर्ष झालं की,
स्वःताच्या मनाने जगावं म्हनतोय


रडत पडत डिग्री झाली उडत उडत नॉकरी आली
पुढच्या वर्षी तरी एखदया मुलीसोबत
लग्न करावं म्हनतोय
लग्नानंतर तरी
स्वःताच्या मनाने जगावं म्हनतोय

शेवटी एकदाची लग्नाची कामगिरी झाली
आई वडील, शिक्षकांची झाली आता
बायकोची गुलामगिरी आली
एखाद्या वर्षात एखाद्यं मुलबाळ व्हावं म्हनतोय
बाप झाल्यावर तरी
स्वःताच्या मनाने जगावं म्हनतोय

हळू हळू मुले झाली व्याप वाढला
ईवल्याश्या नॉकरीचाही ताप वाढला
शेवटी हात पाय हालतात तोपर्यंत
भारतभर फ़िरावं म्हनतोय
रिटायर झाल्यावर तरी
स्वःताच्या मनाने जगावं म्हनतोय

रिटायर झालो हात पायही गळाय लागले
शेवटचे क्षन आल्याचे आता
मलाही कळाय लागले
पुनरजन्म झालाच तर एखादं
जनावर व्हावं म्हनतोय
या जन्मात नाही तर नाही
पुढच्या जन्मात तरी
स्वःताच्या मनाने जगावं म्हनतोय.

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=8565519669230155031

vedya kshani bhaas hoto

वेड्या क्षणी भास होतो तू जवळ असल्याचा...

वेड्या क्षणी भास होतो तू जवळ असल्याचा,
डोळे उगाच दावा करतात तू स्पष्ट दिसल्याचा...

जुन्या त्या पऊलखुणांवर आजही रुणझुण तुझ्या पैंजणांची,
कानी हळूच गुनगुनते हवा.., आवाज जणु तू हसल्याचा...

एकांती कधी मज हाका देती, उधाणत्या त्या खळ-खळ लाटा,
एकटीच तरंगते हळूवार होडी.., भास जणु तू बसल्याचा...

दूर पश्चिमेला क्षितिजा-आड, एकाएकी मग दुरावतो सुर्य,
तांबूस आभाळ, तांबूस किनारा.., आभास जणु तू रुसल्याचा...

येता साद तुझ्या पाऊलांची, अन भोवताली वळून पाहता,
दाटून येते ह्रुदयी हूरहूर, अन मनी ध्यास.., तू... नसल्याचा...

नीरज...

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=3607521847152672401

tujhi athvan

तुझी आठवण


मलाच काळात नाही का मला तुझी आठवण येते
जेथून पळातोय परत तिथेच का मला घेऊन जाते.
आता खरच मी का तुला दोष द्यावा
आता तुला तरी का पश्चाताप व्हावा.
तुझ्यासारखच तुझ्या आठवणिना सोडून पुढे जायचाय
कधीतरी मलाही तुझ्या आधी पहिल यायचाय
पण कधीतरी मला तू नक्की सांग अशी का वागलिस
एकदा तरी प्रेमाला का नाही तू जागलिस
मला माहीत होत तू नाही करणार माझी प्रतीक्षा
सवय मला तूच लावली नाही ठेवायच्या कोणाकडून अपेक्षा
अभिजीत्

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=8457624985603318156

tapri

टपरी

सन्ध्याकाळची वेळ, सगळे जमायचो,
काँलेज सुटलेकी इकडेच यायचो,
वरती छत नाही, फ़टक्या भीन्ति, दोन चार तुटक्या बाकडी,
अश्या तुटक्या फ़ुटक्या विसाव्याच्या जागेला अम्ही 'टपरी' म्हणायचो.

पास, नापास तर कधि अभ्यासाला न्याय,
शेरो शयरी टवाळक्या तर कधी प्रेमचे अध्याय,
ह्या सगळ्या गोष्टिऩ्वर एकच उपाय,
सिगारेट का धुआ और उधार की चाय.

मुव्हि, नाटक, पिकनिकचे तर प्ल्यान बनवीले डिस्कोथेकचे,
कधि बर्थडे बम्प्चे तर अस्वाद घेतले कधि केकचे,
इथेच पराक्रम केलेत आम्ही पोरगी पटविण्याचे,
तर भान्डणात नकाशेही बदलीविलेत अनेकान्चे.

उन्हाळे, पावसळे,हिवाळे गेले,
आणी टपरी प्रेम आमचे वाढतच गेले,
पण एक दिवस टपरी सोडावी लागेल,
या विचाराने मन रडू लागले.

वेळ बदलला काळ बदलला, मीत्रान्चा आता साथ सुटला,
मनात इथली फ़क्त आठवण आहे,
आम्ही नसलो तरी काय झाले,
टपरी अजुणही तशीच सदाबहार आहे

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=13201554085746828946

ha bhaas tujha hotanna

हा भास तुझ होताना.......

मी स्वत:स हरपून जाते, हा भास तुझा होताना
नसलास जरी समोर तू,वाटते जणू असलेला

स्वप्नात माझ्या येउन हैराण मला का करतो
अन अवचित जाग ही येता, तू असाच भवती विरतो!

वेगाने वाहून वारा ,हे केस जेव्हा उडवतो
वाटते मनाला माझ्या, की तूच बटा खेळवतो..

झाडांची अलबेल शाखा ह पदर असा अडवते
ह्र्दय असे धड्धडते जणू तुझीच चाहुल घडते!

पावसांचे अलवार थेंब या ओठांवर ओघळती
वाटॆ तुझाच स्पर्श होई, पण तो ही भासच ठरतो!!

ताटकळत कैक वेळा , वाट तुझी मी बघते
पण तू न ये सामोरा , मन उगा हताश होते !

न कळे मजला क मी, उगाच तुझ्यावर रुसते
मग येता तू सामोरा, गालातच खुद्कन हसते!!

हा भास तुझा होताना........

http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=6599257319708284367